Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

आठवडाभरात ‘हंगाम’ थंडावणार!

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – ऊस आणि पाणी टंचाईचा मोठा फटका जिल्ह्यातील साखर कारखानदारीला बसला आहे. गेल्या हंगामात जिल्ह्यातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांनी 134 लाख मेट्रिक टन गाळप केले होते. यंदा जिल्ह्यातील 13 कारखान्यांनी आतापर्यंत 48 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून त्यातून 48 लाख 83 हजार क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे. चालू हंगामातील जिल्ह्यातील आठ कारखान्यांचे बॉयलर थंडावले असून येत्या आठ दिवसांत उर्वरीत कारखान्यांचे गाळप थांबणार असल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.

ऊसाची टंचाई यामुळे यंदाचा गाळप हंगाम उशीराच सुरू झाला होता. ऊस नसणे आणि अन्य कारखामुळे आधीच जिल्ह्यातील 9 बंद ठेवण्यात आले होते. मात्र, ज्यांच्याकडे ऊस होता त्यांची अवस्था बिकट होती.

यामुळे डिसेंबरच्या तोंडावर सुरू झालेले कारखाने मार्चच्या पहिला अथवा दुसर्‍या आठवड्यात बंद करण्याची वेळ आल आहे. उसाअभावी यंदाच्या हंगामात गणेश, तनपुरे, श्रीगोंदा, केदारेश्‍वर, पियुष (नगर), साईकृपा 1 आणि 2, प्रसाद शुगर, जय श्रीराम हे कारखाने सुरूच झाले नव्हते. तर उस संपल्याने संजीवनी, काळे, ज्ञानेश्‍वर, वृध्देश्‍वर, मुळा, केदारेश्‍वर, मुळा, क्रांती शुगर आणि गंगामाई हे कारखाने बंद झालेले आहेत.
जिल्ह्यात शुक्रवार अखेर 48 लाख मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून त्यातून 48 लाख 83 हजार क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे. साखर उतारात 10.15 निघाला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात 134 लाख मेट्रीक टन गाळप होवून 148 लाख क्विंटल साखरेची निर्मिती झाली होती. तसेच साखर उतारा 11.2 निघाला होता. यंदा कारखान्यांची परिस्थिती बिकट झाली आहे.

बंद कारखान्यांचे गाळ आणि कंसात साखर निर्मिती
संजीवनी 3 लाख 58 हजार मेट्रीक टन (3 लाख 36 हजार क्विंटल), काळे 3 लाख 63 हजार मेट्रीक टन (3 लाख 89 हजार क्विंटल), संजीवनी 3 लाख 58 हजार मेट्रीक टन (3 लाख 36 हजार क्विंटल), ज्ञानेश्‍वर 4 लाख 27 हजार मेट्रीक टन (4 लाख 34 हजार क्विंटल), वृध्देश्‍वर 1 लाख 12 हजार मेट्रीक टन (96 हजार क्विंटल), मुळा 2 लाख 50 हजार मेट्रीक टन (2 लाख 45 हजार क्विंटल), क्रांती 89 हजार मेट्रीक टन (92 हजार क्विंटल), संजीवनी 3 लाख 58 हजार मेट्रीक टन (3 लाख 36 हजार क्विंटल), गंगामाई 5 लाख 53 हजार मेट्रीक टन (5 लाख 32 हजार क्विंटल) असे गाळप केलेले आहे.

पुढील हंगाम खडतर
यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. पावसाचे हे प्रमाण अधिक असले तरी पाऊस उशिरा झाला. यामुळे आडसाली लागवडीचे प्रमाण कमी आहे. यामुळे पुढील हंगामात मुबलक उस राहील, अशी परिस्थिती नाही. मात्र, त्यापुढील हंगामासाठी आशादायक चित्र राहणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

सुरू असणारे कारखाने
अशोक, प्रवरा, थोरात, अगस्ती आणि अंबालिका हे कारखाने अद्याप सुरू असून लवकरच त्यांचा गाळप हंगाम आटोपणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!