साखर कारखानदारांनी विकत घेतले भाजप सरकार : रघुनाथदादांचा आरोप

0

 12 डिसेंबरला शेतकर्‍यांकडील बिलाची होळी करणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यातील आधीचे सरकार हे साखर कारखानदारांचे सरकार होते. आता परिस्थिती उलटी असून राज्यातील सारख कारखानदारांनी भाजपाचे सरकार विकत घेतले आहे. राज्यातील साखर कारखांनदार भाजपचे सरकार चालवत आहेत. राज्यात साखरचा दर सारखा आहे.
मग, ऊसाचे दर वेगवेगळा का? शेतकर्‍यांना पाहिली उचल 3 हजार 500 रूपये प्रमाणे मिळाली पाहिजे. विजेच्या वापरा पेक्षा अधिक वीज बिल शेतकर्‍यांना येत आहे. कर्जमाफीचा फायदा अजून शेतकर्‍यांना मिळालेला नाही. यामुळे 12 डिसेंबरला पुण्यात राज्यातील शेतकरी त्यांच्या कडील थकीत विविध बिलांची होळी करत सरकारचा निषेध करणार असल्याची शेतकरी संघटनेचे नेते रघूनाथ दादा पाटील यांनी दिली.
नगरच्या विश्रामगृहावर रघुनाथदादा पाटील सोमवारी पत्रकरांशी बोलत होते. यावेळी गणेश जगताप, किशोर ढमाले, दिनकर दाभाडे, गणेश घुंगे, बाळासाहेब पठारे, मनोहर वाघ, अशोराव पठारे, शिवाजीराव जरे, मनोहर वाघ, युवराज जगताप, बच्चू मोढवे आदी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थितीत होते.
यावेळी पाटील म्हणाले, शेजारच्या राज्यातील साखर कारखानदार इमानदार आहेत. मात्र, राज्यातील कारखाने बेईमान आहे. राज्यात शेतकर्‍यांच्या ऊसाला एक सारखा दर नाही. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळा दर कशाला? साखरचे दर हे राज्यात एक सारखे असतांना ऊसाचे का नाही? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकर्‍यांच्या ऊसाला 3 हजार 500 रुपये पहिली उचल मिळावी, यासाठी आंदोलने, मोर्चे, उपोषण सुरू आहे.
राज्यातील कारखानदार सांगतात की नफा होत नाही. मग हे कारखानदार एकाच वेळी अनेक कारखाने कसे चालवितात. साखर कारखानदार हे शेतकर्‍यांच्या ऊसावर दरोडा टाकत आहे. दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द करावी.
सर्व कारखान्यांत शेतकर्‍यांच्या ऊसाचा एकच दर निश्‍चित करावा, तोडणी, वाहतूक खर्चावर बंधन टाकून अवास्तव खर्चास लगाम घालावा, आदी मागण्या शेतकर्‍यांच्यावतीने सरकारकडे करण्यात येणार आहे. सरकारला जाग आणण्यासाठी 12 डिसेंबरला पुण्यात शेतकरी कर्जमाफी, वीज बिल, सोने तारण कर्जाचे बिल यासह अन्य बिलांची होळी करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

10 ते 12 डिसेंबर रोजी पुण्या एस.एम.जोशी फाऊंडेशनच्यावतीने कै. शरद जोशी, हुतात्मा बाबू गेणू यांच्या स्मारणार्थ राष्ट्रीय किसान परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची पाटील यांनी यावेळी दिली. तसेच दिवंगत जोशी यांची शेतकरी संघटना फोडण्यासाठी खा.राजू शेट्टी यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन केल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला.

 

LEAVE A REPLY

*