अकोले : प्रेम संबंधातील तणावातून महिला व पुरुषाची आत्महत्या

0
अकोले (प्रतिनिधी) – एक घटस्फोटित महिला व दुसर्‍या विवाहित पुरुषाच्या एकमेकांच्या प्रेम संबंधामध्ये आलेल्या तणावातून दोघांनीही आत्महत्या केल्याची घटना अकोले तालुक्यात घडली आहे. याबाबत अकोले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.
अकोले शहरा जवळ असणार्‍या रेडे येथील बंदावणे नामक विवाहित पुरुषाला दोन मुली, एक मुलगा आहे. त्याचे याच परिसरातील राहणार्‍या एका घटस्फोटित महिलेबरोबर प्रेमसंबंध जडले. दोघेही अनेक दिवसांपासून अकोलेत राहत होते. त्यांचे प्रेमाचे नाते अनेक दिवस टिकले. त्यानंतर या दोघांमध्ये खटके उडू लागले. या वादाचे पर्यवसान दोघांनीही आत्महत्या करण्यात झालेे.
याबाबत संबंधित महिलेच्या वडिलांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे. दरम्यान, या घटनेतील संबंधित पुरुषाने त्या महिलेचा खून करून आत्महत्या भासविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिसांनी रात्री पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहेत. या घटनेमुळे अकोले शहरात एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

*