शाश्वत ऊर्जेकडे ‘सुला’चे यशस्वी पाऊल

0

नाशिक (वा.प.) | झपाट्याने घटत जाणार्‍या नैर्सगिक संसाधानामुळे उर्जानिर्मितीसाठी अपारंपरिक उर्जास्रोताचा वापर करणे काळाची गरज बनली आहे. अशा काळात सुला विनीयार्डने सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मितीत पाऊल टाकले असून यामुळे पर्यावरण रक्षणासह सर्वसामान्यांनाही शाश्वत स्रोतातून वीज उपलब्ध होणार आहे.

आपल्या अनेक शाश्वत कार्यपद्धतींसोबत सुलाने सोलर नेट मीटरिंग पद्धत अवलंबत शाश्वत विकासाकडे आणखी एक उल्लेखनीय पाऊल टाकले आहे. महावितरण अधिकार्यांनी ही पद्धत नाशिकमध्ये रुजवण्यास अथक प्रयत्न घेतले असून ही प्रणाली योग्य आणि यशस्वीरित्या राबवण्यात महावितरण आणि कंपन्यांना यश आले आहे.

गंगापूर व पिंपळगाव युनिट्स येथे पूवी अस्तित्वात असलेल्या आपल्या यंत्रणेलाच सौर उर्जा उपक्रमात छतावर सौर फोटो व्होल्टेक यंत्रणा बसवण्याच्या राज्य शासन आणि महावितरण कंपनीच्या धोरणाअंतर्गत नाशिक विभागातील सुला विनयार्ड्सचा हा प्रकल्प शहरातील सर्वाधिक क्षमतेचा प्रकल्प ठरणार आहे.

भारत सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत वापरावर प्राधान्य देण्याच्या धोरणावर पाऊल ठेवत अनेक तांत्रिक आणि आर्थिक समस्यांवर मात करून हा महत्वाकांक्षी उपक्रम राबवणारा सुला हा पर्यावरणस्नेही उद्योग असून, कंपनी आस्थापानेपासूंच अनेक शाश्वत उपक्रम राबवत आली आहे.

सुला आपल्या स्वत:च्या वीज गरजेपैकी 50 टक्के वीजनिर्मिती स्वत: करते. या प्रकल्पामुळे कंपनीची वीज बिलाची 10 ते 15 टक्के बचत होऊ शकते असे ‘सुला’चे महाव्यवस्थापक (प्रकल्प) त्र्यंबक ओतूरकर यांनी सांगितले. नजीकच्या भविष्यात सुलाचे संपूर्ण हॉस्पिॅटलिटी युनिट 100 टक्के अपारंपरिक उर्जास्त्रोतांवर चालवण्याचा मानस ओतूरकर यांनी व्यक्त केला.

सुला विनयार्ड्स कडून सतरा लाख पन्नास हजार युनिट्स सौरऊर्जेची निर्मिती केली जात आहे. यातून 2430 घरांना वर्षभर मिळेल इतकी वीजनिर्मिती होत आहे. सुलाच्या एकूण वीज वापरा पैकी पन्नास टक्के विजेची बचत या उपक्रमातून साधली जात आहे.

नजीकच्या भविष्यात कोळसा व खनिजतेल अशा पारंपारिक स्रोतातून उर्जानिर्मिती करणे दुरापास्त होणार आहे. अशा काळात सुलाने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने उचललेले पाऊल हे इतर उद्योगसमुहासाठी अनुकरणीय ठरावे.

LEAVE A REPLY

*