नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे जलतरण स्पर्धेत यश

0

नाशिक | दि. ११ प्रतिनिधी

नाशिक : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय व जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय . शालेय स्पर्धेत के. व्ही. एन. नाईक कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी हर्षल शार्दुल याने ५० मीटर मुक्त जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

तसेच अकरावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी अनुज कित्तूर यान अनुक्रमे ४०० ,८०० व २००  मीटर स्पर्धेत रौप्यपदक व कांस्यपदक  पटकावले. ४ बाय १०० मीटर स्पर्धेत लावकिक खांडेकर, प्रसाद साळवे, सिद्धांत भांबरे, हर्षल शार्दुल यांनी कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, उपाध्यक्ष पी. पी. धात्रक, सहचिटणीस  अॅड. तानाजी जायभावे, संचालक माणिक सोनावणे, संचालक प्राचार्य डॉ. शांताराम बडगुजर, उपप्राचार्य कैलास गीते, क्रीडा संचालक प्रा. दिनकर गीते व चेतन आव्हाड आदींनी खेळाडूंचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

LEAVE A REPLY

*