चापडगावातील बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश

0

चापडगाव | चापडगाव येथील शेतकरी दत्तात्रय मुरलीधर सांगळे यांच्या विहिरीत बिबट्या आढळून आला. सांगळे विहिरीतील मोटार चालू करण्यासाठी गेले असता त्यांना बिबट्या विहिरीत असल्याचे लक्षात आले.

सांगळे विहिरीत डोकावताच बिबट्याने डरकाळी फोडली त्यामुळे ते भयभीत झाले होते. त्यानी लगेच वन अधिकारी वसंत आव्हाड यांना फोन करून माहिती कळवली त्यांनीही पाहणी करून वरील अधिकाऱ्यांना कळविले.

त्यानंतर बिबट्याला वरती काढण्यासाठी शिडी लावण्यात आली होती. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बिबट्या बाहेर पडला.

विहिरीच्या बाहेर पडताच बिबट्याने ड़ोगराच्या दिशेने कूच करत जंगलात निघून गेला. यावेळी एम एन बोड़के वनअधिकारी पी एस सरोदे, इरकर, भुजबळ,  वसंत आव्हाड तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले.

LEAVE A REPLY

*