Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यामनसेच्या प्रत्येक आंदोलनास यश - राज ठाकरे

मनसेच्या प्रत्येक आंदोलनास यश – राज ठाकरे

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज (ता. २७ नोव्हेंबर) मुंबईतील गोरेगावमध्ये गट नेत्यांसाठी सभा झाली. या सभेत पालिका निवडणुका आणि अन्य राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे भाष्य केले.

- Advertisement -

महाराष्ट्र नव निर्माण सेने कडून अनेक आंदोलन करण्यात आली. त्या आंदोलनास यश आले. टोल नाका, भोंगे, अशा अनेक विषयांवर त्यांनी हात घातला. ६५ ते ७० टोलनाके आंदोलनानंतर बंद झालेत. मनसेने आतापर्यंत केलेल्या आंदोलनाची पुस्तीकाच काढणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राजकारणात आरोप प्रत्यारोप करताना राजकीय नेत्यांनी राजकारणात विविध पक्ष्याच्या प्रवक्त्यांनी सर्वांनी भान ठेऊन बोलण्याची गरज असल्याचेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

करोनामुळे निवडणूक लांबवल्या गेल्या. या वर्षी मार्चमध्ये निवडणूक होतील, असं वाटत होतं. पण मला वातावरणात निवडणूक दिसत नाही. फेब्रुवारी-मार्चमध्ये लागेल, अशी चर्चा आहे. पण वातावरण तसं दिसत नाहीय. महाराष्ट्राचा सध्या सगळ्या बाजूने खोळंबा झालाय. त्यामुळे नक्की काय होणार? या गटाला मान्यता मिळणार की नाही मिळणार? यांची निशाणी मिळणार की नाही मिळणार? त्यांची डोकी त्यांना खाजवू द्या”, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. दरम्यान राज्यपाल कोश्यारी, कॉंग्रेस खा. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला

दरम्यान, मुंबई महानगर पालिका निवडणुकी साठी मनसेच्या प्रत्येक सैनिकाने आपल्या आपल्या विभागात कामाला लागण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या