TWEET : मुंबईनंतर ‘स्टाईलक्रॅकर’चे ‘नाईट मार्केट’आता पुण्याच्या कोरेगाव पार्कमध्ये!

आलियाचा स्टाईल मंत्रा आता पुणेकरांसाठी ; पुण्यात अवतरणार सेलिब्रिटी फॅशन जलवा

0

बॉलिवूड इंडस्ट्री नेहमीच आपल्या स्टाईल बद्दल सतर्क असते. आपल्या चाहत्यांमध्ये आपला लूक ‘ट्रेंडी’ असावा यासाठी ते पुरेपूर प्रयत्न करत असतात.

बॉलिवूडची ग्लॅमडॉल म्हणून ओळखली जाणारी आलिया भट ही तिच्या ट्रेंडी स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. स्टाईल व्यतिरिक्त ती आता चर्चेत होती ती म्हणजे स्टाईलक्रॅकर या कंपनीत तिने केलेल्या गुंतवणुकीमुळे.

या कंपनीसोबतच आलियाने वर्षाच्या सुरुवातीला पुणेकरांना ट्रेंडी व स्वत:चे स्टाईल स्टेटमेंट देण्याचा कानमंत्र दिला आहे. नाईट मार्केटच्या माध्यमातून पुण्यातील तरूणाईला बड्या डिझाईनर्सची स्टाईल आजमावता येणार आहे.

प्रसिद्ध फॅशन डिझायनर अर्चना वालावलकर ही स्टाईलक्रॅकरची संस्थापक आहे. नुकतीच आलिया भटने या कंपनीत गुंतवणूकही केली आहे. पुणे हे तरूणांच्या फॅशन स्टाईलसाठी एक उत्तम बाजारपेठ आहे. स्टाईलक्रॅकरला ऑनलाईनही उतम प्रतिसाद मिळाला आहे. तेव्हा ऑफलाईनदेखील पुणेकर याला नक्कीच पसंती देतील.

मुंबईत अशाप्रकारच्या मार्केटला हजारो लोकांनी हजेरी लावली होती, अशाचप्रकारे पुण्यातही हे मार्केट चांगलेच गाजेल असे अर्चना वालावलकर यांनी सांगितले. स्टाईलक्रॅकर 13 व  14 जानेवारी रोजी पुण्यातील कोरेगाव पार्कमधील ‘रागा लॉन, येथे  नाईट मार्केट आयोजित करत आहे. मुंबईप्रमाणेच पुणेही आता धावपळीचे शहर बनत आहे, त्यात पुण्यात वाढत चाललेल्या आयटी इंडस्ट्रीच्या जाळ्यामुळे इथे तरूणाईची संख्याही मोठी असते. हीच तरूणाई आपला प्रोफेशनल व पर्सनल लूक सतत बदलत अनेक नवनवीन स्टाईल्स ट्राय करते. तेव्हा नाईट मार्केट हे पुणेकरांसाठी खास पर्वणी ठरणार आहे.

शिवाय या नाईट मार्केट मध्ये अनेक ब्रॅंड्सचे कपडे तसेच मनोरंजन, वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि बरेच सरप्रायझेसही पुणेकरांसाठी आहेत. आलियाची स्टायलिस्ट अर्चना वालावलकर या मराठमोळ्या स्टायलिस्टलाही भेटता येणार आहे.

 

LEAVE A REPLY

*