Friday, April 26, 2024
Homeनाशिकलाॅकडाऊन : फिलीपिन्समधील विद्यार्थ्यांचे अँँपद्वारे होतायेत लेक्चर; शैक्षणिक अभ्यासक्रम सुरळीत

लाॅकडाऊन : फिलीपिन्समधील विद्यार्थ्यांचे अँँपद्वारे होतायेत लेक्चर; शैक्षणिक अभ्यासक्रम सुरळीत

नाशिक । कुंदन राजपूत

देशासह महाराष्ट्रात लाॅकडाऊनमुळे शाळ, महाविद्यालये बंद असून शैक्षणिक वर्ष देखील येत्या सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. दुसरीकडे फिलीपिन्स या देशात  महाविद्यालये जरी बंद असली तरी सर्व शाखांचे आॅनलाईन अॅपद्वारे अभ्यासक्रम सुरळित सुरु आहे. लेक्चर, थेरी प्रॅक्टिकल नियमित होत असून त्यांची परीक्षा देखील आॅनलाईन घेतली जात असल्याचे  तेथे एमबीबीएसचे शिक्षण घेणारे नाशिकचे  विद्यार्थी सांगतात. लाॅकडाऊनमुळे त्याच्या शैक्षणिक वर्षावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे ते सांगतात.

- Advertisement -

नाशिकचे दर्शन खैरनार व मोहित पवार हे दोघे फिलिपीन्सची राजधानी मनिला मधील अवर लेडी आॅफ फातेमा  मेडिकल काॅलेज युनिवर्सिटी मध्ये एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. या ठिकाणी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी आहे. फिलिपिन्समध्ये देखील करोनाचा कहर सुरु असून पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या १३ हजाराच्या घरात गेली आहे.

ते बघता तेथील सरकारने १० मार्चला देशभरात लाॅकडाऊन जारी केला. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी तेथेच अडकले. राजधानी मनिलासह संपूर्ण फिलिपिन्समध्ये लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी होत आहे असे ते सांगतात. पहाटे ५ ते रात्री ८ या वेळेत अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरु आहेत. नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी पोलिसांकडून आॅनलाईन पास दिला जातो.

तेही घरातिल एकाच व्यक्तिला बाहेर पडण्याची मुभा आहे. रात्री ८ ते पहाटे ५ या वेळेत अत्यावश्यक कारण वगळता घराबाहेर पडण्यास मनाई आहे. सोशल डिस्टन्स, तोंडाला मास्क लावणे याची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे.

तेथील सरकारकडून गोरगरिबांना मोफत रेशन व मेडिल सेवा दिली जात आहे.  या ठिकाणी देखील लाॅकडाउन टप्प्याटप्याने वाढविण्यात आला असून तो ४ सप्टेंबरपर्यंत कायम राहणार आहे. दर्शन व मोहीत हे तेथे फ्लॅटमध्ये तीन चार जणांच्या ग्रुपने राहतात. राहत्या अपार्टमेंटमध्ये भारत नावाची मेस असून या ठिकाणी दोन्ही वेळची जेवणाची व्यवस्था होती. त्यामुळे त्यांचे जेवणाचे व राहण्याचे हाल झाले नाही.

१० मे ला हे विद्यार्थी विशेष विमानाने मुंबई विमानतळावर परतले. तेथून त्यांना नाशिकमध्ये आणून क्वारंटाईन करण्यात आले. फिलिपिन्समध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात कोणताही खंड पडलेला नाही.

अवर लेडी आॅफ फातेमा मेडिकल युनवर्सिटिचे विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अभ्यासक्रम सुरु आहे. दर्शन व मोहित हे नाशिकमध्ये क्वारंटाईन असले तरी कॅनव्हाॅस अॅपद्वारे लेक्चर अटेंड करतात. प्रॅक्टिकल व इतर थेरी देखील ते अॅपद्वारे पूर्ण करतात. लाॅकडाऊनमध्येही त्यांचा अभ्यासक्रम सुरळित सुरु आहे.

पॅरेन्टस् ग्रुप 

फिलिपिन्समध्ये शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या पाल्यांचा पॅरेंटस् नावाचा ग्रुप आहे. या ग्रुपमधील सदस्यांनि तेथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणावे यासाठी भारतीय दूतावासाकडे मदत मागितली. दूतावासाने देखील या विद्यार्थ्यांना  सर्व मदत केली.

भारत सरकारच्या विशेष विमानाने आम्ही मायदेशी परतलो. आम्ही आता क्वारंटाईन असलो तरी अॅपद्वारे आम्ही लेक्चर, थेरी प्रक्टिकल पूर्ण करत आहोत. भारतीय दूतावासाने आमची खूप मदत केली.

– दर्शन खैरनार, विद्यार्थी ( फिलिपिन्स)

- Advertisment -

ताज्या बातम्या