Type to search

नाशिक

चिंचखेड येथील विद्यार्थ्यांची नावे झळकणार मंगळावर

Share

चिंचखेड | वार्ताहर

वाचून नवल वाटेल परंतु हे सत्य आहे की, चिंचखेड येथील कै. एल.जी.पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांची नावे चक्क जगातील सर्वात मोठी अवकाश संशोधन करणारी संस्था म्हणजेच नासाच्या यानावर झळकणार आहे ते ही मंगळग्रहावर.1971 मध्ये मंगळ ग्रहावर पाहिले याने गेले याला 2020 मध्ये 50 वर्ष पूर्ण होत असून हा योग साधून नासा मिशन MARS 2020 राबवत असून,त्याअंतर्गत 17 जुलै 2020 मध्ये मानवविरहित ATLAS-V541 हे यान मंगळ ग्रहावर पाठविले जाणार आहे.

या यानावर एक चिप असणार आहे ज्यावर 2 लाख नावे कोरली जाणार आहे.नासाने प्रथमच जगभरातील लोकांना आपली नावे मंगळ ग्रहावर जाणाऱ्या या यानावर झळकावण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये विद्यालयातील 240 विद्यार्थ्यांची नावे देखील झळकणार आहे यासाठी विद्यालयाचे तंत्रस्नेही शिक्षक संधान एस.एम यांनी या 240 विद्यार्थ्यांची नोंदणी नासाकडे केली असून नासाने यासाठी या मुलांना बोर्डिंग पास देखील उपलब्ध करून दिले आहे.

प्रथमच विद्यार्थ्यांची नावे मंगळ ग्रहावर झळकणार असल्याने गावातील लोकांकडून विद्यालयाचे कौतुक होत आहे. नि. ता. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, स्कुल कमिटी अध्यक्ष चंद्रभान बोरस्ते, उद्धवराव निरगुडे, सदस्य पंढरीनाथ संधान, रामनाथ पाटील, माधव पवार, रणजित जगताप, खंडेराव पाटील, निवृत्ती जगताप, माणिकराव पाटील, विठ्ठल संधान, बी.आर.पाटील, त्रंबक संधान, संजय जगताप, केशव पाटील, चंद्रभान संधान, योगेश मेधने, तुषार झेंडफळे, पं.स.सदस्य संगीत उघडे सरपंच संजय पंढारे, उषा मेधने, सुभाष मातेरे, सदाशिव पाटील आदींनी यासाठी शुभेच्छा दिल्या.यासाठी मुख्याध्यापक चौधरी आर.ए.मातेरे व्ही.एन,देशमाने बी व्ही,पवार एम.पी, पाटील एस. जे,श्रीमती हिरे ए. एन,जाधव एस.आर भगवान वाघ यांनी मार्गदर्शन केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!