विशेष गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थी तयारीला; 16 ऑगस्ला लागणार यादी

0
नाशिक | अकरावी प्रवेशासाठी आता विशेष गुणवत्ता यादीचे प्रवेश सुरू झालेले असून 16 ऑगस्टला पहिली विशेष गुणवत्ता यादी लागणार आहे. तर दुसरया विशेष गुणवत्ता यादीचा विचार त्यानंतर केला जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज भाग एक व भाग दोन भरण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली. रविवारी संध्याकाळी 5 पर्यंत या यादीसाठी अर्ज करता येणार आहेत.

चौथ्या गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना 10 ऑगस्ट दुपारी 2 वाजेपर्यंत प्रवेश घेतलेल आहेत. त्यातही प्रवेश न झालेले विद्यार्थी पुढील विशेष फेरीसाठी पात्र असणार आहेत. यात गुरुवारी संध्याकाळी रिक्त जागांचा तपशील शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून प्रसिध्द करण्यात आला. दरम्यान शुक्रवार 11 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट संध्याकाळी 5 पर्यंत अर्जाचा भाग दोन, नवीन अर्ज, अपूर्ण अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांनी सुरवात केलली आहे. रविवारी केवळ विद्यार्थी पसंतीक्रम भरू शकणार आहेत.

यावेळी मार्गदर्शन केंद्राना सुटी दिली जाणार आहे.16 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजता विशेष गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाणार आहे या यादीत नावे जाहीर करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना 18 व 19 ऑगस्ट संध्याकाळी 5 पर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे.

दरम्यान, विशेष फेरीसाठी काही नियम व अटी शिक्षण उपसंचालकांनी घातलेल्या आहेत. त्यानुसार यापूर्वी प्रवेश घेतलेले विद्यार्थी वगळून इतर विद्यार्थी, यापूर्वीच्या फेर्‍यांंमध्ये पहिला पसंतीक्रम मिळूनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी, प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी, प्रवेश नाकारलेले विद्यार्थी, कॉलेज अलॉट होऊनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी या प्रवेश फेरीसाठी प्रवेश घेऊ शकतात. त्यांना पसंतीक्रम व अर्ज भरण्याविषयी पूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या फेरीमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम पुन्हा नव्याने भरणे अनिवार्य आहे. जे विद्यार्थी पसंतीक्रम नव्याने भरतील त्याच विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी विचार केला जाईल.दरम्यान विशेष फेरी एकचे हे वेळापत्रक असून गरजेनुसार अजून विशेष फेर्‍या वाढविल्या जाण्याची शक्यता आहे.

त्या किती व कोणत्या प्रमाणात वाढविल्या जाणार याबाबत मात्र अजून शिक्षण विभागाने माहिती दिलेली नाही. दरम्यान विशेष गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर उर्वरीत प्रवेशासाठीचा विचार केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

*