जेलरोडवरील ‘त्या’ विद्यार्थ्याने स्वतःच रचला होता अपहरणाचा बनाव

बनाव असल्याचा पोलिसांचा अंदाज ठरला खरा

0
नाशिकरोड | जेलरोड येथील शालेय विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याचा गुन्हा उपनगर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. हा मुलगा इंग्लिश स्कूलचा असून त्यानेच अपहरणनाट्य रचल्याचा पोलिसांचा अंदाज खरा ठरला असून विद्यार्थी रात्री घरी परतल्याचे समजते.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जेलरोड येथील नारायणबापूनगर भागातील रहिवाशी प्रथमेश विलास वाघ (१४) हा येथून जवळच असलेल्या इंग्लिश स्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकतो.
आज सकाळी १० वाजेच्या सुमारास प्रथमेश नारायणबापूनगर जवऴील खासगी क्लासला गेला होता. क्लास सुटल्यानंतर तो मित्रासह पायी घरी येत होता. मित्र घरी गेल्यानंतर प्रथमेश पुढे निघाला असता अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केले.
प्रथमेशच्या घराजवळ साफसफाई करणार्‍या महापालिका महिला कर्मचार्‍याला त्याचे दप्तर सापडले. या महिलेने त्याचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला असता नागरिकांनी प्रथमेशचे घर शोधून त्याच्या कुटुंबियांना याबाबत कल्पना दिली.
त्यानंतर उपनगर पोलीस ठाण्याचे वपोनि बाजीराव महाजन, उपनिरीक्षक महेश शिंदे हे सहकार्‍यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी दप्तराची तपासणी केली असता त्यात ‘माझी मजबूरी असल्याने तुमच्या मुलाचे अपहरण करत असल्याचे’ लिहिलेले दिसून आले. अपहरणकर्त्याने आपले नाव रविंद्र फसाने असे लिहिले होते.
मात्र, ही चिठ्टी प्रमथमेशनेच लिहिल्याचा पोलिसांचा अंदाज होता. रात्री हा विद्यार्थी घरी परतल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*