गौळाणे परिसरातील पथदीप मागील चार महिन्यांपासून बंद

वारंवार तक्रार करून देखील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

0

इंदिरानगर (प्रतिनिधी):-गौळाणे रस्त्यावरील पथदीप मागील तीन ते चार महिन्यांपासून बंद असून येथील विजवाहक केबल ठिकठिकाणी खंडित झाली आहे.

तरी ही संपूर्ण केबलच बदलण्याची आवश्यकता असतांना केवळ किरकोळ काम करून वेळ मारून नेली जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

पथदीपाच्या तारा पाण्यात

ठिकठिकाणी केबलच्या तारा एकमेकांना जोडले आहे. तरी या भागात ग्रामस्थांची पाळीव जनावरे चरायला जात असतात. त्यांना किंवा ग्रामस्थांना विजेचा शॉक लागून दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे.

तरी पथदिवे तीन-चार महिन्यांपासून बंद असल्याने अंधारात ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.

याबाबत वारंवार तक्रारी करूनही नगरसेवक सुदाम डेमसे यांनी याकडे लक्ष दिलेले नाही असे ग्रामस्थांनी सांगितले आहे. या ठिकाणी वीज केबलची जोडणी पाण्यात असल्याने धोका वाढला असूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही.

LEAVE A REPLY

*