Type to search

सार्वमत

दोन गटात तुंबळ हाणामारी : कोल्हारमध्ये 4 जणांना अटक

Share

कोल्हार ( वार्ताहर ) : घरावर दगड मारण्याच्या संशयावरून कोल्हार भगवतीपूर येथील अंबिकानगर वसाहतीत दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. परस्परांविरुद्ध फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे. उर्वरित पसार असून त्यांचा शोध सुरु आहे.

कोल्हार भगवतीपूर येथील अंबिकानगरमध्ये वास्तव्यास असलेल्या विनोद साहेबराव जाधव (वय 24 ) यांच्या फिर्यादीवरून 14 जणांविरूद्ध तर अंबिकानगरमध्येच वास्तव्यास असलेल्या वसीम सिकंदर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 15 जणांविरूद्ध लोणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी हे करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!