Type to search

Breaking News Featured maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

कॉम्प्यूटरमधला अँटीव्हायरस ‘Quick Heal’ चा मालक महाराष्ट्राचा; तोही सातारचा! वाचा सविस्तर

Share

देशदूत डिजिटल विशेष

प्रत्येकाच्या संगणकात या क्विक हिलचे स्थान का महत्वाचे असते?  क़्विक हिल या आघाडीच्या अँटीव्हायरस  कंपनीचा मालक कोण असेल?  असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील. या बहुचर्चित कंपनीचा मालक महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही असे हे व्यक्तिमत्व असून काबाड कष्ट करून आज ते इथवर पोहोचले आहे.

त्यांचे नाव कैलास काटकर. मुळगाव सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील ललगुण हे. वडील पुण्यात एका कंपनीत हेल्पर म्हणून कामाला असल्यामुळे त्यांचे बालपण पुण्यातच गेले.

त्यांना एक लहान भाऊ आणि एक बहिण. नतावाडीतल्या एका छोट्याशा खोलीत ते राहायचे. कैलाश हे सर्वात थोरले. परिस्थिती नसताना आई वडिलांनी त्यांना इंग्रजी माध्यमात शिकवलं.

सुरुवातीपासून काहीही करण्यात कैलाश तरबेज होते. दहावीची परीक्षा दिल्यानंतर त्यांनी परिस्थितीअभावी नोकरी शोधायला सुरुवात केली. एक दिवस त्याला पेपर मध्ये एक जाहिरात दिसली, एका कंपनीमध्ये कॅलक्युलेटर दुरुस्त करणाऱ्याची आवश्यकता होती. कैलाशने आयुष्यात कधी कॅलक्युलेटर बघितलाही नव्हता.

तरीही त्याच्या हुशारीने मुलाखतीसाठी आलेल्या पंचवीस जणांमधून त्याची निवड झाली. अंगभूत खटाटोपणा कामी आला. त्या कंपनीत कॅलक्युलेटर दुरुस्तीचे काम तर शिकलाच, शिवाय बँकांमधल लेजर पोस्टिंग मशीन, ऑफसेट मशिन अशा वेगवेगळ्या मशिनरी दुरुस्त करायला यायला लागल्या.

नोकरी सोडली आणि मंगळवार पेठेत स्वतःचा दुरूस्तीच दुकानं सुरु केलं. सोबत एक मुलगा सुद्धा ठेवला. त्यांची दिवसभर वेगवेगळ्या मशीन सोबत झटापट चालायची. पैसे बऱ्यापैकी मिळू लागले. एक दिवस कैलासला एका बँकेत एक नवीनच मशीन दिसले त्याने चौकशी केली कोणी तरी सांगितलं, कैलाश विचारात पडला. येणार युग जर कॉम्प्युटरचं आहे तर आपल्याला शिकून घेतलं पाहिजे. पण शिकायचं कुठे हा सुद्धा प्रश्न होता.

नव्वदच्या दशकातला तो काळ. कॉम्प्यूटरने नुकताच भारतात चंचू प्रवेश केला होता. त्याच्या येण्यान आपल्या नोकऱ्या जातील म्हणून डाव्या-उजव्या संघटना एकत्र लढा देत होत्या. कॉम्प्यूटर प्रचंड महाग होते आणि फक्त मोठ्या ऑर्गनायझेशनमध्येचं दिसायचे. कैलाशला कोणी कॉम्प्यूटरच्या जवळ देखील येऊ देत नव्हत.

एकदा चान्स मिळाला. पुण्यातील एका नामांकित दैनिकाचे संगणक बंद असल्याचे त्याला समजले. त्याने ते दुरुस्त करण्याचा विडा उचलला. पुढे याच दैनिकाने त्यास ते संगणक देऊन टाकले.

कैलाशच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर कैलाशला बँकादेखील कामे मिळू लागले. पुण्यात कॉम्प्यूटर हार्डवेअर दुरुस्तीमध्ये कैलाश काटकर हे नाव प्रसिद्ध झाले.

स्वतःच शिक्षण अर्धवट सुटल पण कैलाश यांनी आपल्या भावाबहिणीच्या शिक्षणाच्या बाबतीत कोणतीच तडजोड केली नाही. धाकटा भाऊ संजयसुद्धा हुशार होता. त्याला त्यांनी मॉडर्न कॉलेजमध्ये कॉम्प्यूटर इंजिनियरिंगला प्रवेश घ्यायला लावला. तो देखील दिवसभर कॉलेजकरून संध्याकाळी भावाच्या कामात मदत करत होता.

त्याकाळी व्हायरस हे प्रकरण नव्यानेच उदयास आले होते. साथीच्या रोगाने जसे माणसे आजारी पडतात त्याप्रमाणेच कॉम्प्यूटरदेखील एखाद्या विशिष्ट प्रोग्रॅमचा प्रादुर्भाव झाला तर आजारी पडतात. मग ते आजारी पडू नयेत यासाठी असत रोगप्रतिबंधकारक औषध यालाच म्हणतात अँटी व्हायरस.

या व्हायरसच्या साथीची लागण झालेले बरेच कॉम्प्यूटर पुण्यात दुरुस्तीला कैलाश यांच्याच दुकानांत यायचे. लोक सांगायचे की तुम्हीच याला दुरुस्त करा. पण हा विषय होता सॉफ्टवेअरचा. हार्डवेअर वाले त्यात करणार. काहीतरी करून कैलाश ते कॉम्प्यूटर सुरु करून द्यायचे.त्यांच्या धाकट्या भावाने संजयने सारख्या सारख्या लागण होणाऱ्या व्हायरसवर उपाय म्हणून एक टूल बनवले होते. जे त्यांच्या कस्टमरला खूप आवडले.

त्याच वेळी कैलास काटकर यांच्या बिझनेस माइंडमध्ये आयडिया आली की हा अँटी व्हायरसचा धंदा बराच पैसा कमावणार. त्यांनी भावाला एक स्पेशल कॉम्प्यूटर घेऊन दिला. नतावाडीमधल्या त्या वस्तीतल्या एका खोलीच्या घरात संजय काटकर अँटी व्हायरस बनवायच्या मागे लागला. दीड वर्षे लागली पण मराठी माणसाच स्वतःचं अँटी व्हायरस तयार झालं. त्याला नाव देण्यात आलं.

संजयनी स्वतःच या अँटी व्हायरसचा लोगो डिझाईन केला, पकेजिंग तयार केलं. कैलास काटकर कंपन्याच्या दारोदारी फिरून आपले प्रोडक्ट खपवू लागले. कॉम्प्यूटरमधल्या डाटाची नासाडी करणाऱ्या व्हायरसवर उतारा असलेला अँटीव्हायरस असण किती गरजेचे आहे हे पटवून संगेपर्यंत त्यांना नाकीनऊ यायचे पण त्यांनी जिद्द सोडली नाही.

त्याकाळात पुण्यात बऱ्याच आयटी कंपन्या सुरु होत होत्या. आयटीपार्क उभं राहत होत. अशा सगळ्या नव्या जुन्या कंपन्यांना परदेशी अँटीव्हायरस पेक्षा चांगलं आणि स्वस्त असलेलं हे देशी अँटी व्हायरस पसंतीस पडलं. क्विक हिल अँटीव्हायरसबरोबर अनेक कंपन्यांनी वर्षाचे करार केले.

अजून मोबाईल फोन देखील आले नव्हते अशा काळात आफ्टर सर्विसला देखील भरपूर महत्व होते. कैलाश काटकर यांनी मेहनतीने आपले ग्राहक सांभाळले. पुण्याबरोबर नाशिक, मुंबई येथे देखील आपली टीम उभी केली. वेगवेगळ्या शहरात जाण्याचाही त्यांना फायदा झाला. क्वालिटीच्या जीवावर स्पर्धेच्याकाळातही क्विकहिल मोठी झाली. मंगळवार पेठेत असणाऱ्या ऑफिसमधून कधी एक लाख स्क्वेअर फुटच्या ऑफिसमध्ये रुपांतर झाले ते कळले देखील नाही.

आज तिथे तेराशेच्या पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांचे ऑफिसेस उघडलेले आहेत. आज ऐंशीहून अधिक देशातल्या कॉम्प्यूटरमध्ये हे देशी अँटीव्हायरस बसवलेले दिसत.(माझ पानवरून साभार)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!