शिंदे टोलनाक्यावरील वसूली तात्काळ थांबवा अन्यथा आंदोलन; नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा इशारा

0
नाशिक | सिन्नरकड़े जाण्यासाठी शिंदे येथे सुरु करण्यात आलेल्या टोल चालकांकड़े कुठलाही शासन निर्णय नसून या टोलवर टोल चालकांकडून होणारी टोल वसूली अनधिकृत असून येथील टोल वसूली तात्काळ थांबवावी अशी मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून करण्यात आली आहे.

यासंदर्भात नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयपाल शर्मा, वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र फड, उपाध्यक्ष रवि विसपूते, सेक्रेटरी सुभाष जांगडा, विशाल पाठक, अमोल शेळके, ज्ञानेश्वर वर्पे यांनी सदर टोल नाक्यावर जाऊन अनधिकृत टोल वसूली बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

यावेळी असोसिएशनच्या पदधिकाऱ्यांनी शिंदे टोल नाका येथे भेट देऊन टोल चालकांकड़े टोल वसूली बाबत शासन निर्णय मिळावा ही विनंती केली. मात्र सदर टोल प्रशासनाकडून याबाबत शासन निर्णय देण्यास टाळाटाळ केली. सदया आमच्याकड़े शासन निर्णय नसल्याचे त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

त्यानंतर टोल नाक्यावरील अनधिकृत टोल वसूली तात्काळ थांबवून शासन निर्णय मिळेपर्यंत वसूली करण्यात येऊ नये अन्यथा ट्रान्सपोर्ट असोसिएशन कडून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा टोल प्रशासनाला दिला. तसेच या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नाशिकचे जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त यांच्याकडे लेखी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*