Type to search

महसूल विभागाचे दुर्लक्ष; खडी क्रेशर उलटून २० वर्षीय कामगाराचा मृत्यू

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

महसूल विभागाचे दुर्लक्ष; खडी क्रेशर उलटून २० वर्षीय कामगाराचा मृत्यू

Share

नाशिक | प्रतिनिधी

वाडीवऱ्हे परिसरातील दहीगाव शिवारात खडी क्रेशर उलटून एका कामगाराचा मृत्यू झाला. गणेश बबन बोंबले (वय २०) असे या कामगाराचे नाव आहे.

आज दुपारी ही घटना दहीगाव शिवारात घडली. याठिकाणी खडी क्रेशर धोकेदायक ठिकाणी असल्याचे काही कामगारांनी खडी क्रेशर मालकाच्या निदर्शनास आणून दिले होते.

मात्र, मालकाने याकडे लक्ष दिले नाही. आज सकाळी नेहमीप्रमाणे १०-१५ कामगारांनी खडी क्रेशरच्या कामास सुरुवात केली होती. दरम्यान, सकाळी अकरा वाजेच्या सुमारास २ कामगार दगडाच्या खाणीत काम करत होते. तोच त्यांच्या अंगावर खडी क्रेशर कोसळले.

यातील एकजन बचावला असून दुसरा कामगार मात्र याखाली दबून जागीच ठार झाला. दरम्यान, याठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून हे काम सुरु होते. कामगाराच्या जीवावर उठलेल्या खडी क्रेशरकडे महसूल विभागाने साफ दुर्लक्ष करून अनधिकृतपणे काम करण्यास मोकळे रान उपलब्ध करून दिले होते. त्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.

दरम्यान, घटना घडल्यानंतर खडी क्रेशर चालक लक्ष्मण सदगीर घटनास्थळावरून पसार झाला असून त्याच्या विरोधात  गुन्हा दाखल करून कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!