स्टीव्ह जॉब्सच्या ‘अॅपल १’ चा होणार लिलाव

0
नवी दिल्ली : ‘अॅपल’ने बाजारात नवे प्रॉडक्ट लाँच केले की ते आपल्याकडे असावे अशी अनेकांची इच्छा असते. आता ‘अॅपल’ आपले सर्वात जुनं पण ऐतिहासिक प्रॉडक्ट विकण्यासाठी लाँच करत आहे. ‘अॅपल’ कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह व्होज्नियाक यांनी तयार केलेल्या पहिल्या वहिल्या संगणकाचा २५ सप्टेंबरला लिलाव होणार आहे.

1970 साली अॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वोझनिक यांनी अॅपल 1 हा संगणक तयार केला होता. या खास संगणकाचा लिलाव बोस्टन स्थित आरआर ऑक्शनकडून आजोजित करण्यात येणार आहे. अॅपल 1 हा संगणक त्या खास 60 संगणकांपैकी आहे, जे आजही अस्तित्वात आहेत. अॅपल 1 संगणकाला अॅपल I किंवा अॅपल-1 या नावानेही ओळखले जाते. हा एक डेस्कटॉप संगणक आहे. तसेच अॅपलने 1976 साली तो बाजारात आणला होता.

बोस्टनमधील ‘आर.आर ऑक्शन’ या कंपनीने या लीलावाचे आयोजन केले आहे. या संगणकाचा मदरबोर्ड, पीरियड स्टाइल मॉनिटर,की बोर्ड प्रत्येक भागाचा लिलाव होणार आहे. ‘अॅपल’च्या या पहिल्या वहिल्या संगणकासाठी काही कोटींची बोली लागण्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

*