Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पंचवटी : इमारतीचा जीना कोसळून दोघे जखमी

Share
पंचवटी | वार्ताहर
पंचवटीतील सुकेणकर लेनमधील रास्ते आखाडा तालमीलगत असलेल्या एका जुन्या इमारतीचा जीना कोसळून महिलेसह एकजण जखमी ल्याची घटना शुक्रवारी(दि.५) दुपारी झाली. घटनेतील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून सायंकाळी उशीरापर्यंत महापालिका आणि पोलीस प्रशासनाचे मदत कार्य सुरू होते.
गेल्या तीनचार दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने शहरातील जुने वाडे पडून काहीजण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच आज दुपारी १ वाजेच्या सुमारास पंचवटीतील सुकेणकर लेनमधील श्रीराम कृपा अपार्टमेंट या तीन मजली इमारतीचा जीना कोसळून सरिता जैन (वय ५०) व धीरज किशनचंद ललवाणी (वय ३०) जखमी झाले.
पंचवटी अग्नीशामक दलाने तातडीने धाव घेत जखमींना बाहेर काढल्याने अनर्थ टळला. यादोघांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्‍न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
विशेष म्हणजे तीस ते पस्तीस वर्षे जुनी असलेली इमारत मोडकळीस आल्यामुळे या इमारतीचे काम एका बांधकाम व्यावसायिकाला पण दिले होते, असे येथील रहिवासीयांनी सांगितले. आज दुपारच्या दरम्यान अचानक तिस-या मजल्यावरील सिमेंटचा जीना तुटुन पडला.
दरम्यान पंचवटी अग्निशमन दलाला या घटनेबाबत माहिती मिळताच दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढून तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्नीशामक दलाचे सब ऑफिसर जे. एस. अहिरे, लिडींग फायरमन व्ही. एम. डांगळे, एस. जे. कानडे, फायरमन एन.पी. म्हस्के, एम. एस. गायकवाड आदी उपस्थित होते.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!