Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : जर्मनीच्या स्टीफन व्हॉर्मन्स पॅराप्लेजिक सायकलिस्टचे नाशकात जंगी स्वागत

Share

नाशिक | प्रतिनिधी 

जर्मनीच्या स्टीफन व्हॉर्मन्स पॅराप्लेजिक सायकलिस्टचे आज नाशिकमध्ये आगमन झाले. यावेळी विविध क्षेत्रातील नाशिककर आणि सायकलीस्टच्या वतीने स्टीफनचे मनोभावे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी नाशिकच्या काही सायकलीस्टने स्टीफनसोबत सायकल चालवून आनंद साजरा केला. स्टीफन नाशिक-पुणे रोडवरील नासिक्ल्ब हॉटेल पोहोचल्यानंतर संचालक रामेश्वर सारडा यांच्या वतीने त्याचे स्वागत करण्यात आले. नाशिकचे सायकलीस्ट आणि सायकलप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती याप्रसंगी होती.  नाशिककरांनी दिलेल्या प्रेमाबद्दल स्टीफनने आनंद व्यक्त करत आभार मानले.

स्टीफन सायक्लोथॉन २०२० च्या माध्यमातून ऑर्थोपेडिक अपंगत्वाबद्दल जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून रत्ननिधी सामाजिक संस्था आणि इंडियन मर्चंट चेंबर यांच्यातर्फे सायक्लोथॉन २०२० चे आयोजन करण्यात आले आहे.

आपल्यावर ओढवलेल्या अपंगत्वामुळे स्टीफन झोपलेल्या अवस्थेत येऊन सायकल सायकल चालवितात. या अनोख्या सायकलीचे आज नाशिक नगरीत आगमन झाले.

नाशिक नगरीत येताच बिटको पॉईंट येथील शिवाजी पुतळा वर पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात, हार व फेटा बांधून स्टीफनचे स्वागत करण्यात आले. यावेळी महिलांच्या वतीने औन्क्षणनही करण्यात आले. यावेळी स्टीफनने नाशिककरांचे आभार मानले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!