राज्याचे कृषी पर्यटन धोरण लवकरच

0

नगर जिल्ह्यातील मोराची चिंचोलीचा गौरव

मुंबई – कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी त्याला जोडव्यवसायाची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात कृषी पर्यटनाला मोठा वाव असून त्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने स्वतंत्र कृषी पर्यटन धोरण तयार केले आहे. हे धोरणलवकरच जाहिर करण्यात येईल, अशी माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.राष्ट्रीय कृषी पर्यटन परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

राज्य शासनानेही कृषी पर्यटनाला चालना देण्याचे ठरविले असून त्यादृष्टीने समग्र असे कृषी पर्यटन धोरण तयार करण्यात आले आहे. येत्या 23 मे रोजी यासंदर्भात वित्त आणि ऊर्जा मंत्र्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली आहे. धोरणाचा मसुदा तयार झाला असून त्यास मान्यता घेऊन लवकरच हे धोरण जाहिर करण्यात येईल. कृषी पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने अनेक तरतुदी या धोरणात असतील, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कृषी पर्यटनात विशेष कार्य करणार्‍या विविध संस्था, व्यक्ती यांचा या परिषदेच्या समारोप समारंभात विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पर्यटन मंत्री रावल व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. चंद्रपूर येथील एक मोकळा श्वास ग्रीटुरीजम सेंटरफचे सुहास अशेकर, थेऊर (जि. पुणे) येथील कल्पतरु ग्रीटुरीजम सेंटरचे प्रतिक कंद, मोराची चिंचोली (जि. अहमदनगर) येथील आनंद कृषी पर्यटन केंद्राचे आनंदराव थोपटे, औरंगाबाद येथील सृष्टी ग्रीटुरीजम सेंटरचे किरण सानप व प्रतिभा सानप, अनंतपूर (आंध्रप्रदेश) येथील अदरना ग्रीटुरीजम सेंटरचे एन. रामकृष्णा, पालघर येथील गोवर्धन इको व्हीलेजचे नीरज कपूर यांना यावेळी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

LEAVE A REPLY

*