Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

लालपरीचा वाढदिवस; वीरपत्नी, सेवाज्येष्ठ कर्मचार्‍यांचा सत्कार

Share

नाशिक | प्रतिनिधी 

ग्रामीण भागातील सर्वांच्या सुखदु:खात सहभागी होणारी एसटी असल्याने एसटी सेवा अखंडपणे चालू रहावी. खासगी प्रवासी वाहतुकीमुळे एसटीच्या प्रवाशांची सख्या दिवसेंदिवस घटत आहे. एसटीचा प्रवास सुरक्षित व संरक्षण देणारा असल्याने प्रवाशांनी मानसिकता बदलत एसटी प्रवासास प्राधान्य द्यावे. प्रवाशांच्या अपेक्षेनुसार एसटीचालकांनी एखाद्या प्रवाशाने हात दाखविल्यास बस थांबवावी. जिल्ह्यातील आगारांमध्ये स्वच्छता ठेवावी. हात दाखवा, एसटी थांबवा ही योजना अखंडपणे कार्यान्वित रहावी, असे मत ग्राहक पंचायतीचे सुधीर काटकर यांनी व्यक्त केले.

गोरगरिबांचा आधार असलेली एसटी ७१ वर्षांची झाली. त्यानिमित्त राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील नवीन मध्यवर्ती बसस्थानकात (सीबीएस) एसटीचा वर्धापन दिन शनिवारी सकाळी १० वाजता थाटात साजरा करण्यात आला.

वर्धापनदिनानिमित्त बसस्थानक खास सुशोभित करण्यात आले होते. ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. विभाग नियंत्रक नितीन मैंद यांच्या हस्ते प्रवाशांना गुलाबपुष्प व पेढा देऊन स्वागत करण्यात आले. अनपेक्षित स्वागत पाहून प्रवासीदेखील भारावून गेले.

नितीन मैद म्हणाले, प्रवाशी व एसटीच्या कर्मचार्‍यांच्या योगदानामुळे एसटीची यशस्वी वाटचाल सुरु आहे. यापुढेही प्रवाशी व कर्मचार्‍यांचे असेच सहकार्य रहावे. राज्य परिवहन महामंडळ नाशिक विभागात आजपासून स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा.

ही योजना नवीन सीबीएस बसस्थानक, निमाणी बसस्थानक, मालेगांव, मनमाड, सटाणा, सिन्नर, नांदगांव, ईगतपुरी, लासलगांव, कळवण, पेठ, येवला, पिंपळगांव येथील बसस्थानकांवर कार्यान्वित झाली आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विभाग नियंत्रक नितीन मैंद, विभागीय वाहतूक अधिकारी अरूण सिया, अरूण भार्गवे, यंत्र अभियंता कुवर, सुरेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पूनम हांडे यांनी केले. आभार कामगार अधिकारी सूरज बडे यांनी मानले.

प्रथम स्मार्ट कार्डधारकाचा सत्कार

एसटीच्या ७१ व्या वर्धापनदिनानिमित्त आजपासून जिल्ह्यातील १३ आगारांमध्ये स्मार्टकार्ड योजना कार्यान्वित करण्यात आले. या योजनेचे जिल्ह्यातील प्रथम लाभार्थी विजयकुमार गोपाळकृष्ण दाधीच यांना मान्यवरांच्या हस्ते स्मार्टकार्ड प्रदान करण्यात आले.

वीरपत्नी, सेवाज्येष्ठ कर्मचार्‍यांचा सत्कार

देश संरक्षणार्थ शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीला उजाळा देत वीरप्त्नी हिराबाई पावसकर, कांचन नवगिरे, निर्मला ठाकरे, सुषमा सुनील मोरे, सुवर्णा शंकर शिंदे, भारती शरद पगार, कमल वसंत लहाने यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सेवाज्येष्ठ एसटी कर्मचारी चालक जुबेर शेख, मालेगांव, प्रशांत विठ्ठल मोरे यांचाही मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!