Saturday, April 27, 2024
Homeनाशिकराज्य तंत्रशिक्षण मंडळ परीक्षेत ‘महावीर’च्या मुलींची बाजी

राज्य तंत्रशिक्षण मंडळ परीक्षेत ‘महावीर’च्या मुलींची बाजी

मेकॅनिकल, कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगचा निकाल 100 टक्के, शिवानी पैठणे ९०.२२% मिळवून प्रथम तर तेजस पवार ८९.९० % मिळवून द्वितीय

नाशिक | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई कडून घेण्यात येणाऱ्या हिवाळी – २०१९ सत्र परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. श्री महावीर एज्युकेशन सोसायटीच्या महावीर पॉलिटेक्निक नाशिक मधील विद्यार्थिनींनी सदर परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे परीक्षेत प्रथम आणि द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये यंदा मुलींचीच आघाडी आहे. म्हसरूळ-वरवंडी रोड वरील महावीर पॉलिटेक्निक या महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर इंजिनिअरींग तृतीयवर्ष डिप्लोमामध्ये शिकणारी शिवानी पैठणे ९०. २२% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम तर तेजस पवार याने ८९.९० % गुण मिळवून महाविद्यालयात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.

तर शीतल मौले या विद्यार्थिनीला ८९.३३ % गुण प्राप्त झाले, तीने तृतीय क्रमांक पटकावला आहे . मेकॅनिकल, कॉम्प्युटर ,सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगचा निकाल १००% लागल्यामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे.

प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरींग मधील कॉम्प्युटर इंजिनिअरींगमध्ये शिकणारी रुपाली चव्हाण ८५. ४७% गुण मिळवून, मेकेनिकल इंजिनिअरींगमध्ये तेजस सोनवणे ८७.९०% गुण मिळवून , सिव्हील इंजिनिअरींगमध्ये ईश्वरी जाधव ७८.८६ % मिळवून , इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगमध्ये भूषण जाधव ८७. ४३% गुण मिळवून प्रथम आले. व्दीतीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरींग मधील कॉम्प्युटर इंजिनिअरींगमध्ये शिकणारी कोमल थेपणे ८७% गुण मिळवून, मेकेनिकल इंजिनिअरींगमध्ये दवीक बाविस्कर ७४.३२ % गुण मिळवून , सिव्हील इंजिनिअरींगमध्ये यशश्री सोनार ८३. ११ % मिळवून , इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगमध्ये निकिता वाघ ८६. २५% गुण मिळवून प्रथम आले. तृतीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरींग मधील कॉम्प्युटर इंजिनिअरींगमध्ये शिकणारी शिवानी पैठणे ९०.२२ % गुण मिळवून, मेकेनिकल इंजिनिअरींगमध्ये तेजस सोनवणे ८७. ९१ % गुण मिळवून , सिव्हील इंजिनिअरींगमध्ये तेजस पवार ८९. ९० % मिळवून , इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगमध्ये कांचन पडोळ ८६. ७०% गुण मिळवून प्रथम आले.

महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकणारे साक्षी पिंगळे, दामिनी सोनवणे, स्वप्नील शिंदे, आदित्य धोंगडे, सिमा गुप्ता, उदय तकाटे, मयूर देवरे, प्रथमेश बोराडे यांनी महाविद्यालयाच्या वर्ग गुणवत्तेत स्थान मिळवले.

व्दितीय वर्षात शिकणारे माधुरी निकम, अंकुश दास, विक्रांत सिग, सायली शार्दूल, स्वजल देशमुख, शिवम राजोळे, वैष्णवी निंबाळकर, संदीप गवळी यांनी वर्ग गुणवत्तेत स्थान मिळवले.

तर महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकणारे शीतल मौले, सुजितकुमार सिंग, रोहित शर्मा, दुर्गेश सूर्यवंशी,धर्मराज डेरले, विजय चौधरी, गौरव गुंबाडे, निशा डेरले,अजिंक्य विसपुते, श्रद्धा घोरपडे, रश्मी कोळंबे, अस्मिता खैरनार, प्राज महाजन यांनी वर्ग गुणवत्तेत स्थान मिळवले.

श्री महावीर एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री हरिष संघवी, व्यवस्थापकीय विश्वस्थ राहुल संघवी, महावीर एज्युकेशन सोसायटीच्या समन्व्यक तथा डीन डॉ. प्रियंका झवर, महावीर पॉलिटेक्निकचे प्राचार्य संभाजी सगरे, विभाग प्रमुख अनुप सोनवणे, विभाग प्रमुख रोशनी ढोकळे, विभाग प्रमुख सागर खैरनार,प्रा. संजय भामरे तसेच इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी विद्यार्थ्यांचे त्यांना मिळालेल्या यशामुळे अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या