Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

राज्यभर प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Share

8 कोटी 98 लाख 39 हजार मतदार

मुंबई- विधानसभा निवडणुकीसाठी 21 सप्टेंबरला आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यभर धडधडणार्‍या प्रचार तोफा शनिवारी सायंकाळी सहा वाजता थंडावल्या. आता जाहीर प्रचार संपला असून भेटीगाठी आणि छुपा प्रचार सुरुच राहणार आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय पक्षाचे नेते स्टार प्रचारक यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील सर्व मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी सेामवार (दि.21) मतदान होणार आहे.

त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. लोकशाहीच्या या महोत्सवात पुरुष, महिला, तृतीयपंथी, दिव्यांग असे 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार आहेत. यात पुरुष मतदारांची संख्या 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार 2 हजार 634, दिव्यांग मतदार 3 लाख 96 हजार, आणि सर्व्हिस मतदार 1 लाख 17 हजार 581 आहेत. निवडणुकीसाठी 288 मतदारसंघात 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. यात मुख्य मतदान केंद्रांची संख्या 95 हजार 473 असून सहायक मतदान केंद्रांची संख्या 1 हजार 188 आहे. खास महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी 352 सखी मतदान केंद्रे राहणार आहेत.

असे आहेत यंत्रे
विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र (बॅलेट युनिट) आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे 6 लाख 50 हजार कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!