Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

राजभवनावर घटनात्मक हालचाली सुरू; सर्वात मोठ्या पक्षाला सत्तेचे निमंत्रण मिळण्याची शक्यता

Share

मुंबई | प्रतिनिधी 

राज्यातील सत्ता नाट्याचा अखेरचा अंक सुरू झाला असून राजभवनावर घटनात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. आज भाजप शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेची भुमिका देखील अधिक तीव्र झाली आहे. निवडणूकीच्या निकालानंतर १५ दिवस झाले तरी महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री’ पदावरून युतीतला तिढा काही सुटताना दिसत नाही. अद्याप कोणत्याही पक्षाने सत्तास्थापनेचा दावा दाखल केलेला नाही.

त्यातच उद्या ८ नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभेची तसेच सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अस्तित्वात असलेल्या सरकारची मुदतही संपत आहे. त्यामुळेच राज्यात निर्माण झालेल्या परिस्थीतीत घटनात्मक  जबाबदारी पूर्ण करण्यासाठी राज्यपालांनी राज्याचे महाधिवक्ते  आशुतोष कुंभकोणी यांना पाचारण केले.

त्यापूर्वी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. भाजपा नेत्यांनी राज्यपालांसोबत कायदेशीर बाबींची चर्चा केली. त्यांना सध्याच्या राजकीय स्थितीची माहिती दिली. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन व्हावे, अशी अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ते म्हणाले की सत्तास्थापनेबाबत वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील.

दरम्यान, येत्या ९ तारखेपूर्वी सरकार स्थापन झाल्यानंतर नवे सरकार अधिवेशनाची तारीख जाहीर करेल. त्यानंतर आमदारांचा शपथविधी आणि विधानसभा अध्य़क्षांची निवड होणार आहे. त्यामुळेच भाजप सत्तेचा दावा करत नाही कारण संख्याबळ नसेल तर त्यांचा अध्य़क्ष निवडून येवू शकत नाही. शिवाय बहुमत सिध्द करण्यासाठी भाजपकडे संख्याबळ नसल्यानेच ते दावा करत नाहीत असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!