राज्यस्तरीय महोत्सव; लोककला पाहून श्रोते मंत्रमुग्ध

0

वाघ्या-मुरळी, शाहीर, वासुदेव, नंदीवाले, भारूड, लावणीचेे सादरीकरण

अहमदनगर (प्रतिनिधी) – वाघ्या-मुरळी, रायरंद, शाहीर, वासुदेव, नंदीवाले, सनई, आराधी, भारूड आदी लोककलांचे कलाकारांनी एकापेक्षा एक सरस केलेले सादरीकरण, त्यातच भारूड व जागरण गोंधळाचा रंगलेला कार्यक्रम आणि शेवटी ठसकेबाज लावणीने वाढलेली रंगत, यामुळेच नगरच्या राज्यस्तरीय लोककला महोत्सवाची शान वाढविली. यावेळी प्रकाश औटी यांनी व्यसनमुक्तीवर सादर केलेल्या कार्यक्रमाद्वारे हास्याच्या विविध प्रकारांचा उलगडा करत उपस्थित श्रोत्यांचे मने जिंकत मनोरंजनही केले.
नगरला मंगळवारी पंडित जवाहरलाल नेहरू व वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त नेहरु युवा केंद्र, जिल्हा समाजकल्याण कार्यालय, जिल्हा क्रीडा कार्यालय, रयत प्रतिष्ठान व जय स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सावाचे उद्घाटन महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते झाले. प्रबोधन व लोकजागृतीचे प्रभावी माध्यम लोककला आहेत. हा आपल्या सामाजिक संस्कृतीचा वारसा असून, ही संस्कृती टिकविण्यासाठी लोककलेला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याची भावना महापौर कदम यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाला मनपा विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक किशोर डागवाले, समाज कल्याण अधिकारी नितीन उबाळे, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे, माजी कर्नल (नौसेना) सदाशिव भोळकर, अ‍ॅड. भानुदास होले, अ‍ॅड. प्रशांत साळुंके, अ‍ॅड. महेश शिंदे, पोपट बनकर आदी उपस्थित होते. या लोककला महोत्सवात भारूड, जागरण गोंधळाचा कार्यक्रम रंगला.
तर वाघ्या-मुरळी, रायरंद, शाहीर, वासुदेव, नंदीवाले, सनई, आराधी, भारूड कलाकारांनी एकापेक्षा एक सरस लोककला सादर केल्या. लावणीने महोत्सवाची रंगत वाढली. प्रकाश औटी यांनी व्यसनमुक्तीवर कार्यक्रम सादर करत श्रोत्यांचे मनोरंजन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाना डोंगरे, नयना बनकर, मीना म्हसे, कांतिलाल जाडकर, जयश्री कुलथे, भाग्यश्री नरवडे, सलीम सय्यद, डॉ. अमोल बागूल, रावसाहेब झावरे, संजय साळवे, सचिन गुलदगड, विनायक नेवसे, शिवाजी नवले, सचिन हिरवे, मंजुश्री रॉय, दिनेश शिंदे, रजनी ताठे, प्रियंका डोंगरे, प्रतिभा डोंगरे, हरीश ठाकरे आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक अ‍ॅड. महेश शिंदे यांनी केले. पोपट बनकर यांनी आभार मानले.

 

LEAVE A REPLY

*