देवीभोयरेच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत ‘गाढवाचं लग्न’ प्रथम

0
निघोज (वार्ताहर) – पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील 40 व्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेमध्ये मुंबई येथील कलाअविष्कार प्रस्तुत ‘गाढवाचं लग्न’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकविला. स्पर्धेचा बक्षिस वितरण काँग्रेसचे पारनेर तालुका अध्यक्ष डॉ. भास्करराव शिरोळे व गणेश ट्रान्स्पोर्टचे भिमाजी घुले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डी. जी. फर्म मुंबईचे अध्यक्ष देवेंद्र गायकवाड होते.
यावेळी डॉ. भास्करराव शिरोळे म्हणाले, राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेमुळे देवीभोयरेचे नाव राज्यात पोहोचले आहे.नाट्यस्पर्धेमुळे ग्रामीण कलाकारांसाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळाले असुन, यापुढील काळात या नाट्यस्पर्धेला शासकीय अनुदान मिळणेकामी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.
यावेळी नाट्य परीक्षक शशीकांत नजान, दत्ता गाडगे, शेखर वाघ, सतीष मुळे, धनेश भंडारी, शिवाजीराव जाधव, सरपंच सुजाता गाजरे, उपसरपंच विकास सावंत, मोहन मुळे, संपतराव वाळुंज, मंडळाचे अध्यक्ष बाबुराव बेलोटे, उपाध्यक्ष अमोल गजरे, संदिप मुळे, कार्याध्यक्ष शरद बोरुडे, सचिव भाऊसाहेब सरडे,
सहसचिव धिरज भंडारी, खजिनदार भाऊसाहेब बेलोटे, संपर्क प्रमुख दीपक मुळे, प्रसिद्धीप्रमुख ताराचंद गाजरे, संपत तिकोणे, अजिंक्य बेलोटे, दिनेश चौधरी, दिनेश गायकवाड, निलेश सरडे, सचिन बेलोटे, सिताराम आरोटे, कैलास बेलोटे, सचिन श्रीमंदिलकर, सागर सरडे, ललीत बेलोटे, विकास धुळे, जितेश सरडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संपतराव वाळुंज यांनी केले. सूत्रसंचालन मुळे, अमोल गजरे यांनी केले. स्वागत बाबुराव बेलोटे यांनी केले तर आभार विश्वनाथ गाजरे यांनी मानले.

स्पर्धेमधील सांघिक बक्षिसे  –
प्रथम- कला अविष्कार मुंबई प्रस्तुत ‘गाढवाचं लग्न’, द्वितीय- संक्रमण पुणे प्रस्तुत ‘साकव’, तृतीय- रंगकर्मी प्रतिष्ठाण प्रस्तुत ‘आडला भट, रचला कट’, चतुर्थ- प्रिय कलाकृती पुणे प्रस्तुत ‘माझ्या छत्रीचा पाऊस’, पाचवा- समर्थ अकादमी पुणे प्रस्तुत ‘रामराम पाहुणं’, सहावा- अगम् पुणे प्रस्तुत ‘आती रहेंगी बहारे’, सातवा- ब्राम्हणवाडा नाट्यकला मंच प्रस्तुत ‘भक्त पुंडलिक’, आठवा- श्रीघोडेश्वरी सांस्कृतीक कलारंजन, घोडेगांव प्रस्तुत ‘नाते तुझे नी माझे’, नववा- मुक्ताई आर्ट्स औरंगाबाद प्रस्तुत, ‘उसनी बायको पाहीजे’, दहावा- नाट्यरंग पुणे प्रस्तूत ‘खेळीमेळी’.

वैयक्तिक बक्षिसे  –
प्रथम- यतीन माझीरे (साकव), द्वितीय- संजय कसबेकर (गाढवाचं लग्न), तृतीय- रितेश साळुंखे (आडला भट रचला कट). उत्कृष्ट अभिनेता-प्रथम- यतीन माझीरे (अच्युत नारायने- साकव), द्वितीय- सागर पवार (गण्या- रामराम पाहुणं), तृतीय- तेजस इंदापुरकर (गोपी- खेळीमेळी), उत्तेजनार्थ – बबन जाधव (नामदेवशास्त्री). उत्कृष्ट अभिनेत्री- प्रथम- अन्विका वाघ (यामिनी-साकव), द्वितीय- अंजली गुंडे (सिमा-आडला भट रचला कट), तृतीय- कस्तुरी केसरकर(आई, सासु, बाई, सिस्टर-माझ्या छत्रीचा पाऊस). उत्कृष्ट विनोदी कलाकार- प्रथम- सचिन जाधव (दिवाणजी-गाढवाचं लग्न).

LEAVE A REPLY

*