Type to search

क्रीडा नाशिक

राज्य हार्ड कोर्ट बाईक पोलो स्पर्धेत बुलढाणा प्रथम, नाशिक व नागपूर तृतीय स्थानी

Share

नाशिक । प्रतिनिधी

1 ल्या वरिष्ठ राज्य हार्ड कोर्ट बाईक पोलो स्पर्धेत बुलढाणा संघाने अजिंक्यपद पटकावले. द्वितीय स्थानी नगपूर राहिले. तर नाशिक व अहमदनगर यांना तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले.

हिरावडी येथे कै. दत्ताजी मोगरे क्रीडांगणावर 22 व 23 मे दरम्यान झालेल्या 1ल्या राज्य वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र जम्प रोप संघटनेचे अध्यक्ष रमेश मारवाडी यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना म्हणाले, खेळा बद्दल खेळाडूंची आस्था कशी असावी खेळ हा खेळ भावनेने खेळावा याबद्दल खेळाडूंना मार्गदर्शन केले, तसेच स्पर्धा सुरू असतांना जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक , यांनी देखील भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून नागपूर, अकोला, परभणी, भंडारा, बुलढाणा, ठाणे, सोलापूर, नाशिक, धुळे , अ. नगर , इत्यादी जिल्ह्यातून खेळाडू सहभागी झाले होते.

या समारंभ प्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच हा खेळ भारतात प्रथम खेळला गेला ते पण नाशिक च्या पावन नगरीतून खेळाची सुरुवात झाली आणि या नवीन खेळाची 1 ली राज्य स्पर्धा असतांना देखील महाराष्ट्रात अनेक खेळाडूंनी यात सहभाग नोंदविला त्याद्दल त्या खेळाडूंच्या मार्गदर्शकांचे व खेळाडूंचे अभिनंदन केले.

या खेळाचा प्रचार प्रसारास योग्य ते मार्गदर्शन व प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमास मधुकर देशमुख, सी.डी.रोटे, दीपक निकम उपस्तीत होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्वप्नील वाळके यांनी केले, आभार अविनाश वाघ यांनी मानले , स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, अमोल आहेर , मयूर गुरव, राहुल रांजणे, रोशन घोलप, प्रतीक देशमुख, अनिकेत वाघ, पांडुरंग गुरव यांनी प्रयत्न केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!