Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या

पालिका कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : २ सप्टेंबरपासून सातवा वेतन आयोग लागू होणार

Share

मुंबई | प्रतिनिधी

राज्य सरकारने नगरपालिका आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित सातवा वेतन आयोग पालिका कर्मचाऱ्यांना येत्या २ सप्टेंबरपासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचार्यांकडून सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागण्या होत होत्या. दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली असून येत्या २ सप्टेंबरपासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

स्थानिक स्वराज संस्थांमधील नगरपालिका आणि महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याचेही याप्रसंगी सांगण्यात आले आहे.

यामुळे ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने या कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ केल्यामुळे समाधानाचे वातावरण आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगाची मागणी केली होती.

त्या पार्श्वभूमीवर ऐन निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचे घोषित केले आहे. येत्या २ सप्टेंबरपासून कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ होणार असलायचे सांगितले जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!