Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

खूशखबर! : राज्य सरकारची सातव्या वेतन आयोगाला मंजुरी

Share

मुंबई : राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेट दिली आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी मंजूरी दिली आहे. हा वेतन आयोग १ जानेवारीपासून लागू होणार आहे.  त्यामुळे राज्य सरकारच्या सेवातील निवृत्तीवेतनधारकांसह २५ लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

नववर्षानिमित्त सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना ही भेट दिली आहे. १ जानेवारी २०१६पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने हा वेतन आयोग लागू होणार आहे. १ जानेवारी २०१९पासून ही प्रत्यक्ष वेतनवाढ मिळणार असून फेब्रुवारी २०१९च्या पगारामध्ये ही वाढ दिसून येईल. या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यासंदर्भातील निवृत्त सनदी अधिकारी के.पी. बक्षी समितीच्या अहवालावर आज (दि.२७) मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले.

हा अहवाल लवकर लागू करावा या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी ५ जानेवारी रोजी पुन्हा एकदा सामुहिक रजा आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, त्यापूर्वीच  वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!