Type to search

Featured सार्वमत

नगर: राज्य नाट्य स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – हीरक महोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या राज्य नाट्य स्पर्धेची तयारी राज्यभरात सुरू झाली आहे. यंदाच्या 59 व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या नगर केंद्रावरील नाटके सावेडीतील माउली सभागृहात येत्या 15 नोव्हेंबरपासून रोज सायंकाळी 8 वाजता होणार आहेत. यानिमित्ताने नगरकरांना जिल्ह्यातील हौशी नाट्य कलावंतांची तयारी जोरदार सुरू झाली आहे.

15 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरदरम्यान नगरला 18 नाट्यसंस्थांची नाटके होणार आहेत. यंदा स्पर्धेच्या काळात रोज दोन नाट्य प्रयोग घेण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. पण नाट्यसंघांकडून त्याला विरोध झाल्याने तो आता रद्द केला आहे व पूर्वीप्रमाणे रोज एक नाट्य प्रयोग होणार आहे. स्पर्धाचे समन्वयक मेहेत्रे यांनी सहभागी नाट्यसंघांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शशिकांत नजान (जिप्सी प्रतिष्ठान), श्याम शिंदे (सप्तरंग थिएटर्स ), संजय लोळगे (जय बजरंग युवा सांस्कृतिक संस्था), अमित खताळ (चौपाटी कारंजा मित्र मंडळ), संदीप येळवंडे (घोडेगाव), सागर खिस्ती (रंगोदय नाट्य संस्था), शैलेश देशमुख (रंगकर्मी प्रतिष्ठान), रेणुका भिसे (एकात्मता युवक मंच), नाना मोरे उपस्थित होते. या बैठकीत स्पर्धा वेळापत्रक, ग्रामीण आणि शहरी नाट्य संस्थांच्या अडचणी आणि विविध मागण्यांबाबत चर्चा झाली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!