राज्य नाट्यस्पर्धेस आजपासून प्रारंभ

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने घेण्यात येणारी 57 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धोची प्राथमिक फेरीला आज दि. 7 पासून प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा 20 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे, अशी माहिती नाट्य स्पर्धेचे समन्वयक सागर मेहेत्रे यांनी दिली.
शहरातील माऊली सभागृह येथे या स्पर्धेस सायंकाळी 8 च्या सुमारास प्रारंभ होणार आहे. नाट्य क्षेत्रात राज्य नाट्य स्पर्धा ही अत्यंत मानाची समजली जाते. दरवर्षी राज्य सरकारच्यावतीने ही स्पर्धा भरवली जाते. उदयोन्मुख नाट्य कलावंत, हौशी कलाकार, या स्पर्धामुळे व्यासपीठ मिळत आहे.
या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी श्रीरामपूर येथील सार्थक बहुउद्देशीय संस्थाची याचक (लेखक प्रल्हद जाधव), हे नाटक सादर केले जाणार आहे. या स्पर्धेचा समारोप सोमवार 20 नोव्हेंबर रोजी जिल्हा हौशी नाट्य संघाच्या ‘स्लाईस ऑफ द लाईफ’ या नाटकांने होणार आहे, अशी माहिती मेहेत्रे यांनी दिली.
दि.8 नोव्हेंबर सप्तरंग थिएटर्स, अहमदनगर. अखेरीची रात्र (लेखक – लक्ष्मीकांत देशमुख), दि. 9 नोव्हेंबर द स्प्लिट, (लेखक – प्रसादर बानसोडे) रंगोदय प्रतिष्ठान, अहमदनगर, दि.10 नोव्हेंबर प्रगत कला महाविद्यालय, तारकपूर अहमदनगर. हाटेल (लेखक – गणेश गाडेकर) दि.11 नोव्हेंबर नवरंग नाट्य नाट्य प्रतिष्ठान, अहमदनगर. चाहूल (लेखक – प्रशांत दळवी), दि.12 नोव्हेंबर नगर तालुका ग्रामीण कला, क्रीडा अकादमी, देऊळगांव सिध्दी अहमदनगर. लास्ट स्टॉप (लेखक – बाळासाहेब चव्हाण) यांसह 20 नोव्हेंबर पर्यंत विविध नाटक सादर होणार आहेत.

LEAVE A REPLY

*