Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

राज्याच्या अर्थसंकल्पात चणकापूर, नांदूरशिंगोटेसाठी विशेष तरतूद

Share
सिन्नर । वार्ताहर 
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अतुलनीय पराक्रम गाजवणारे क्रांतिकारक वीर भागुजी नाईक यांचे नांदुर-शिंगोटे येथे स्मारकाची उभारणी करण्यासाठी येत्या वित्तीय वर्षात निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दि.१८ विधिमंडळात केली.
नाशिकमधील कळवण तालुक्यात चणकापूर येथे जंगल सत्याग्रहात वीरमरण आलेल्या शंभर जनजाती वीरांचे देखील स्मारक उभारण्यात येणार असून दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात लोकमान्य टिळक यांच्या पुतळा उभारणीच्या कामांसह राज्यातील आठ स्मारकांसाठी ५० कोटी नियतव्यय तरतूद करण्यात येत असल्याचे अर्थमंत्री म्हणाले. 
सिन्नर, संगमनेर व अकोले परिसरातील आदिवासींना एकत्र करून भागोजी नाईक यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देताना इंग्रजांना सशस्त्र क्रांतीच्या जोरावर सळो की पळो करून सोडले होतेनांदुरशिंगोटे – चास रस्त्यावर असणाऱ्या खिंडीजवळ ते इंग्रजांशी  झालेल्या युद्धात धारातीर्थी पडले होते. 
तेथे त्यांच्या सहकाऱ्यांनी स्मार उभारले आहेया स्मारकाचे पूर्णतः नूतनीकरण करण्याची घोषणा अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी केली यासोबतच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार असून तो मी मिळवणारच.. ही  सिंह गर्जना करणाऱ्याभारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या परिसरात पुतळा बसवण्याच्या कामासाठीही निधीची तरतूद करण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले
भागुजी  नाईक यांच्या स्मारकासोबतच क्रांतिकारक खाजाजी  नाईक यांचे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे, जेष्ठ रंगकर्मी  मच्छिंद्र कांबळे यांचे सिंधुदुर्गातील कुडाळ येथे तर शिवराम राजेभोसले यांचे सावंतवाडी येथे स्मारक उभारण्यात येणार आहे रायगड जिल्ह्यातील चिरनेर येथे वीर नाग्या कातकरी यांचे तर गडचिरोली जिल्ह्यातील घोट येथे वीर बाबुराव शेडमाके यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे
जंगल सत्याग्रहात वीरमरण आलेल्या 100 जनजाती वीरांचे चणकापूर ता. कळवण येथे तर रावलापाणी  स्वातंत्र्यसंग्रामाचे  नंदुरबार येथे स्मारक उभारण्याचा शासनाचा मानस असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
 सर सेनापती वीर बाजी पासलकर यांच्या पानशेत ता. वेल्हे (पुणे)येथील  स्मारकाची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री म्हणाले. या सर्व कामांसाठी चालू वित्तीय वर्षात 50 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात येत असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. 
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!