Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकच्या अमेय खोंड यास बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक

Share

नाशिक | प्रतिनिधी 

ठाणे येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट राज्य जुनिअर १५ व १७ वर्षाखालील आंतरजिल्हा व राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या अमेय खोंड याने सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने मुंबईच्या तनिष्क सक्सेना या प्रतिस्पर्धी खेळाडूचा अंतिम सामन्यात २२-२०, २२-२० असा अटीतटीच्या लढतीत २-० ने पराभव केला.

याअगोदर उपांत्य पूर्व फेरीत पुण्याच्या प्रथम वाणी याचा २१-७, २१-८ असा सहजरित्या तर उपांत्य फेरीत सांगलीच्या प्रथमेश कुलकर्णीचा २१-१४, २१-१७ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तसेच दुहेरीत देखील तनिष्क सक्सेना च्या सोबतीने अंतिम फेरी गाठत रौप्य पदक मिळविले. दुहेरीच्या अंतिम फेरीत आर्य ठाकोरे व ध्रुव ठाकोरे यांच्याकडून १०-२१, १४-२१ असा पराभव स्वीकारत उपविजेते पदावर त्यांना समाधान मानावे लागले.

अमेय खोंड नाशिक जिमखाना येथे बॅडमिंटनचा सराव डॉ. अमित देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करतो. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नाशिक जिमखान्याचे अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते नरेंद्र छाजेड, जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष राधेश्याम मुंदडा, उपाध्यक्ष डॉ. शर्मिला कुलकर्णी, माजी अध्यक्ष एस. राजन, योगेश एकबोटे, पराग एकांडे, सहसचिव शेखर भंडारी, अभिषेक छाजेड, आदींनी त्याचे अभिनंदन केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!