Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सेनेची नाशिक पश्चिम मध्ये बंडखोरी; पश्चिममध्ये पंचरंगी, मध्य चौरंगी तर पूर्वमध्ये तिरंगी लढत

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक पश्चिममध्ये शिवसेनेच्या विलास शिंदे यांनी भरलेला अपक्ष अर्ज आज माघारीच्या दिवशी मुदत संपली तरीदेखील मागे न घेतल्याने या मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. पक्षाकडून शिंदे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदे यांनी अर्ज माघारी न घेतल्याने आता नाशिक पश्चिम मध्ये पंचरंगी लढत बघायला मिळणार आहे. यामध्ये विद्यमान आमदार सीमा हिरे या पुन्हा एकदा भाजपच्या उमेदवारीवर विधानसभा निवडणूक लढवत आहेत. तर राष्ट्रवादीकडून डॉ. अपूर्व हिरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तिकडे माकपकडून डाॅ. डी. एल कराड हे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. तसेच पश्चिम विधानसभा मतदार संघात सर्वात जास्त नगरसेवक असलेल्या ठिकाणी शिवसेनेला जागा न मिळाल्याने अनेक शिवसैनिक नाराज झाले. तर, मनसेकडून दिलीप दातीर यांचेही आव्हान आहे. दरम्यान, नगरसेवक विलास शिंदे यांनी याठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरल्याने याठिकाणी चौरंगी लढत बघायला मिळणार आहे.

नाशिक मध्य मध्येही चौरंगी लढत होणार असून यामध्ये भाजपच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे, मनसेनेचे नितीन भोसले, कॉंग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे संजय साबळे यांच्या लढत होणार आहे.

पूर्व मतदार संघात विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर सानप यांना राष्ट्रवादीकडून तिकीट देण्यात आले आहे. तसेच मनसेनेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी आज माघार घेतल्यामुले सानप यांच्यासमोर भाजपच्या राहुल ढिकले यांचे आव्हान असणार आहे. तर कॉंग्रेसचे गणेश उनव्हणे यांचेही आव्हान या मतदार संघात असणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!