पर्यावरण संरक्षणार्थ तरुणी साकारतेय इको फ्रेंडली हाऊसकिपींग प्रॉडक्ट

0

नवी दिल्ली : बंगळूरमधील नम्रता यादव या तरुणीने पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी इको फ्रेंडली हाऊसकिपींग साधने तयार करण्याचा व्यवसाय सुरु केला. मोठमोठ्या ऑफिसमध्ये हि साधने पुरवली जातात. यामध्ये हँडवॉश, फिनाईल, साबण अशा गोष्टींचा समावेश आहे. नम्रता यांच्या कंपनीचे नाव केमिको असून या कंपनीची स्थापना २०१७ मध्ये करण्यात आली आहे. सध्या देशभरात आपला ब्रँड पोहचवण्यासाठी धडपड सुरु आहे.

काहीतरी वेगळं करण्यासाठी, नम्रताने एक व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला जो कॉर्पोरेट इको-फ्रेंडली हाउसकीपिंग सोल्यूशन्स जसे की द्रव डिशवॉश आणि हँडवाश उत्पादनांची पुरवठा करते. नम्रता सांगतात कि, ब्रँड वाढविण्यासाठी आम्हाला ग्रामीण स्त्रियांसाठी अधिक रोजगार संधी, अधिक प्रशिक्षण आणि वास्तविक वेळ कौशल्य विकास कार्यक्रम आवश्यक आहे कारण आम्ही यथार्थवादी प्रशिक्षणावर विश्वास ठेवतो आणि निश्चित कार्यक्रमात नाही.’

मूळची बंगळुरू येथील असलेली नम्रता सांगतात कि, व्यावसायिकांनी पर्यावरणाला हानी न पोहचवता व्यवसाय करणे गरजेचे आहे. त्यांच्या मते मोठमोठे प्रकल्प राबविणारे पर्यावरण संवर्धनाची गोष्ट करतात परंतु अंमलबजावणी करीत नाहीत. काहीतरी वेगळे करावे व यातून पर्यावरण संवर्धन होण्यास मदत होईल या कारणाने मी हा व्यवसाय चालू केला. पुढे जाऊन पर्यावरणाला अनुकूल असणाऱ्या आणि घरगुती कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करण्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

नम्रता सांगतात कि, “मला जाणवलं की एखाद्याची गरज एखाद्याच्या व्यवसायाची संधी असू शकते. पर्यावरणाशी एकनिष्ठ असणाऱ्या नागरिकांना या गोष्टीची आवश्यकता असते. त्यामुळे या वस्तुंना मागणीही वाढली असल्याचे नम्रता सांगतात. २०१७ ला व्यवसाय सुरु केला तेव्हा ४ लाख रुपये गुंतवावे लागले आणि केमिको स्थापन करण्यात आली. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल साधणाऱ्या वस्तूंची त्यांनी निर्मिती केली आहे.

LEAVE A REPLY

*