Video : कॅलिफोर्नियातून ‘रँम’ सायकल शर्यतीला प्रारंभ; ‘नाशिककर सायकलीस्ट’ने केली ॲनापॉलिसच्या दिशेने कूच

0

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक |  अमेरिकेत रेस अक्रॉस अमेरिका ( RAAM) या प्रतिष्ठेच्या सुमारे पाच हजार किलोमीटर अंतराच्या शर्यतीला आजपासून सुरुवात झाली. या स्पर्धेसाठी नाशिकचे सायकलपटू सहभागी झाले आहेत.

अमेरिकेतील सर्व समुद्रकिनाऱ्यांजवळून जाणाऱ्या आणि डोंगर दऱ्या, वाळवंट अशा विरुद्ध भौगोलिक स्थितीतून मार्गक्रमण करणारी ही सायकल शर्यत अतिशय अवघड समजली जाते.

मात्र तरीही नाशिककर सायकलपटूंनी जिद्द आणि हिंमतीच्या जोरावर ‘टिम सह्याद्री’ नावाने त्यात सहभागी झालेत आहेत.

नाशिकचे रोटरियन डॉ. राजेंद्र नेहते, डॉ. रमाकांत पाटील डॉ. संदीप शेवाले आणि डॉ. पंकज मार्लेशा यांचा या ‘टिम सह्याद्री सायकलिस्ट ’मध्ये सहभाग नोंदवला असून आज सकाळी राष्ट्रगीत गायल्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली.

अमेरिकेतील येथील समुद्र किनारपट्टीलगत असलेल्या मार्गावरून ही सायकल शर्यत जाणार आहे. आज (दि.१७) कॅलिफोर्निया येथून या शर्यतीला सुरुवात होऊन ॲनापॉलिस येथे समारोप होणार आहे.

या नऊ दिवसांच्या कालावधीत ते ४९५० किमी अंतर सायकलवरून कापणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे जवळचे १६ मित्रही त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्याठिकाणी उपस्थित आहेत.

LEAVE A REPLY

*