Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

30 नोव्हेंबरपर्यंत शहर खड्डेमुक्त करा; अन्यथा कारवाई; शहरातील खड्ड्यासंदर्भात स्थायीची तातडीची बैठक

Share

नाशिक । प्रतिनिधी

शहरात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक भागात खड्डे निर्माण झाले असून यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढत आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात तरतूद असल्याने आता येत्या 30 नोव्हेंबरपर्यत खड्डे बुजवून शहर खड्डेमुक्त करा, हे काम मुदतीत न झाल्यास संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करू, असा इशारा आज महापालिका स्थायी समिती सभापती उद्धव निमसे दिला.

गेल्या चार दिवसापासून परतीच्या पावसाने उघडीप घेतली असून शहरात अनेक भागात खड्डे वाढत असतांना हे बुजविण्याचे काम ठप्प झाले आहे. या खड्ड्यासंदर्भात नागरिक वाहनचालकांच्या तक्रारी वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर स्थायी सभापती निमसे यांनी अधिकार्‍यांंची तातडीची बैठक घेतली. या बैठकीस नगरसेविका कल्पना पांडे, नगरसेवक चंद्रकांत खोडे, अतिरिक्त आयुक्त संदीप नलावडे,बांधकाम विभाग प्रमुख तथा शहर अभियंता संजय घुगे, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, रामसिंग गांगुर्डे, सतीश हिरे आदींसह उपअभियंता,शाखा अभियंता उपस्थित होते.

खड्ड्याबाबत सभापती निमसे यांनी प्रभागनिहाय आढावा घेतला. या बैठकीत प्रभाग निहाय असणारे खड्डे, बुजवण्यात आलेले खड्डे याची सविस्तर माहिती अधिकार्‍यांकडून जाणून घेतली. त्याचबरोबर रस्त्याच्या बाजूच्या साईट पट्ट्या, रोड डिव्हायडर स्वच्छता करणेचे काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना सभापतींनी अधिकार्‍यांना दिल्या. प्रत्येक अधिकार्‍याने प्रभागनिहाय पाहणी करून पुनश्च एकदा खड्डे निरीक्षण करून ते खड्डे त्वरित बुजविणेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात व त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश सभापतींनी दिले.

दिनांक 10 नोव्हेंबर नंतर रस्त्यांचे खड्डे तातडीने बुजवून 30 नोव्हेंबरपर्यंत शहर खड्डेमुक्त करण्यात यावे, या कर्तव्यात कसूर झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिकार्‍यावर राहणार असून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सभापतींनी स्पष्ट केले.

यापुढे पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्स डांबर वापरण्याचे नियोजन करणेबाबत सूचना देण्यात आल्या. शहर व परिसरातील प्रभागांमध्ये ज्या भागातील रस्ते दहा ते बारा वर्षांचे झालेले आहे,

त्या परिसरातील लोकप्रतिनिधींना भेटून माहिती घेऊन त्या रस्त्यांचे अस्तरीकरणाचे नवीन प्रस्ताव तयार करून नवीन अर्थसंकल्पात तरतूद करण्यात याव्यात यासंदर्भातील सूचना अधिकार्‍यांनी उपअभियंता – शाखा अभियंता यांना देण्यात आले. या बैठकीत रस्त्यावरील बुजविण्यात येणार्‍या खड्डे- ओघळयांची एकूण संख्या 8641 इतकी आहे.

सर्वाधिक खड्डे व ओघळ्या या प्रभाग 31 मध्ये 737 असून त्याखालोखाल प्रभाग 2 मध्ये 649 आणि प्रभाग 8 मध्ये 600 असेे असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!