स्टाफ सिलेक्शन परीक्षा अचानक रद्द

0
नाशिकरोड | दि. ४ प्रतिनिधी- स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा रद्द झाल्याने नाशिकमध्ये दूरवरून आलेल्या विद्यार्थ्यांची घोर निराशा झाली. परीक्षा रद्द झाल्याचे संयोजकांकडून कळवण्यात न आल्यामुळे नाशिकरोडच्या सेंटरवर आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.

हॉल तिकिटावर स्टाफ सिलेक्शन कमिशनने हेल्पलाईन फोन नंबर दिला आहे. त्यावर संपर्क साधला असता हे दोन्ही फोन बंद असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. परीक्षा केंद्र असलेल्या शाळांनी परीक्षेची चोख व्यवस्था केली होती. मात्र परीक्षा रद्द झाल्याचे त्यांनाही कळवण्यात आले नव्हते.

या परीक्षेसाठी नंदुरबार, धुळे, नाशिक जिल्ह्यातून परीक्षार्थी आले होते. दुपारी २ ते ४ दरम्यान दीडशे गुणांचा पेपर होता. परीक्षा दुपारी २ वजता असली तरी केंद्रावर १ वाजताच हजर राहण्यास सांगण्यात आले होते. विद्यार्थी सकाळी ८ पासूनच के.जे. मेहता हायस्कूल केंद्रावर आले होते. भुर्दंड सोसून विद्यार्थ्यांना परत गावी जावे लागले.

LEAVE A REPLY

*