Thursday, April 25, 2024
Homeनाशिकएसटी कर्मचाऱ्यांचा संप; मनमाडमध्ये जागरण गोंधळ

एसटी कर्मचाऱ्यांचा संप; मनमाडमध्ये जागरण गोंधळ

मनमाड | वार्ताहर Manmad

एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) मिटता मिटेना. गेल्या चार दिवसापासून हा संप सुरु असल्यामुळे एकीकडे प्रवाशांचे हाल सुरूच आहे, तर दुसरीकडे महामंडळाने कळवण आगारातील (Kalwan Depo)17, मालेगाव आणि नांदगाव (Malegaon and Nandgaon Depo) आगारातील 10-10 कामगारांना निलंबित केल्यामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून संतप्त कामगारांनी मनमाडला आज (गुरुवार) जागर गोंधळ आंदोलन (Jagran Gondhal agitation) करून राज्य शासनाचा निषेध केला…

- Advertisement -

जो प्रयन्त विलीनीकरणाची मागणी मान्य होत नाही तो प्रयन्त संप मागे घेणार नसल्याचा निर्धार एसटी कामगारांनी घेतला आहे. संपामुळे नेहमी गर्दी असणाऱ्या बस स्थानकावर मात्र शुकशुकाट पसरलेला आहे. (St workers agitation at manmad)

शासनात विलीनीकरण करण्यात यावे या मुख्य मागणीसह इतर प्रलंबित मागण्यासाठी एसटी कामगारांनी सोमवार पासून एल्गार पुकारून काम बंद आंदोलन सुरु केले आहे.

गेल्या चार दिवसापासून संप सुरु असल्यामुळे मनमाडच्या आगारातून एक ही बस बाहेर पडली नाही. सर्व कामगारांनी आगाराच्या गेट जवळ अगोदर उपोषण केले. त्यानंतर धरणे आंदोलन केले आणि आज जागर गोंधळ (Jagran gondhal agitation) घालून राज्य शासनाचा निषेध केला. जो पर्यंत मागणी मान्य केली जात नाही, तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कामगारांनी केला आहे.

संपाचा फटका शहरा पासून खेड्या-पाड्यावर जाणाऱ्या प्रवाशांना बसत असून जास्त भाडे देवून मिळेल त्या वाहनाने प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. सर्वात जास्त त्रास हा ग्रामीण भागातील नागरीकासोबत साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या इतर राज्यातून येणाऱ्या भाविकांना सहन करावा लागत आहे.

तिकडे चार दिवसात महामंडळाचे देखील सुमारे 25 लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. दरम्यान, एसटी कामगारांच्या संपाला आता वेगवेगळे राजकीय पक्ष (Political Parties) आणि संघटनानी (Communities support to st workers agitation)) देखील पाठींबा देण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या