एस.टीला देवळे पूल बंदचा फटका; उत्पन्न घटले, विद्यार्थ्यांचे हाल

0
आहुर्ली | घोटी-सिन्नर महामार्गावरिल घोटी लगतचा देवळे गावाजवळील पुल धोकेदायक अवस्थेत असल्याने या महामार्गावरिल सर्व अवजड व मोठया वाहनांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामुळे  ईगतपुरी एस.टी.आगारास बसला तीव्र फटका बसला असून त्यांच्या उत्पनात घट झाली आहे.

तर दुसरीकडे प्रवाशांचेही मोठे हाल सुरु आहे. सर्वात गंभीर बाब म्हंणजे तालुक्यातील जवळजवळ चाळीस गावातील विदयार्थ्याचें शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असुन शैक्षणिक दृष्टया मोठे नुकसान होत आहे.

मुंबईहुन सिन्नर, शिर्डीस जोडणारा घोटी येथील हा राष्ट्रीय महामार्ग अत्यंत महत्त्वाचा, जवळचा व सुलभ मार्ग आहे. या मार्गावरुन प्रचंड वाहतुक सुरु असते. यामुळे नाशिक मार्गावरिल वाहतुकिचा ताण बराच हलका होत असतो.

या महामार्गावरच यापुर्वीचा देवळे गावाजवळ एक पुल आहे. या पुलाचे कामास सरासरी सतरा वर्ष झाल्याचे येथील नागरिकाचें म्हणणे आहे. विशेष म्हंणजे घोटी शहरासह सिन्नर, शिर्डी, नगर, अकोला आदी महत्त्वपुर्ण शहरासह नाशिक-मुंबई महामार्गास जोडणारा हा महत्त्वाचा दुवा आहे.

मात्र, या पुलाच्या कामात अत्यंत हलगर्जीपणा झाला असुन अवघ्या दिड दशकात हा पुल वाहतुकीस अयोग्य व्हावा ही बाबच याचा पुरावा आहे असे नागरिक दावा करत आहे.

पुलाचे काम करतानां स्थानिक वाहतुकिचाच विचार करणेत आला होता. मात्र घोटी-सिन्नर-शिर्डी रा.महा मार्गाचे काम सुरु करत असतानांच या पुलावरुन भविष्यातील वाढती वर्दळ लक्षात घेवुन पुलाचे टिकावु व मजबुतीचे काम करणे गरजेचे होते. मात्र सार्व.बांधकाम विभागाच्या हलगर्जी पणाचा व दुरदृष्टीच्या अभावाचा तीव्र फटका आज बसला अाहे असा आरोप स्थानिक करत आहे.

यामुळे प्रवाशांचे हाल सुरु असुन अवैध वाहतुकदाराचीं मात्र चंगळ सुरु आहे. दुसरीकडे अवजड वाहनानां प्रवेश बंदी असतानांही अवजड वाहनाचीं वाहतुक सर्रास सुरु असल्याचे नागरिक सांगतात.

या धोकेदायक पुलावर केवळ फलक व अडथळे उभे केलेले अाहे. प्रत्यक्षात संभाव्य अपघाताचा धोका लक्षात घेवुन येथे सार्व.बांध.विभाग व पोलीस प्रशासनाचा एकही जबाबदार व्यक्ती उपस्थित नसल्याने वाहतुक सुरक्षा राम भरोसेच आहे.

LEAVE A REPLY

*