एसटी बसची कारला धडक; एक ठार, एक जखमी

0

देवगड फाटा (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील देवगड फाट्यापासून एक किलोमीटर अंतरावर एसटी बस व फोर्ड फिएस्टा या वाहनांची समोरासमोर धडक होऊन त्यात एकजण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना काल घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अपघातास व मृत्यूस जबाबदार असल्याचा गुन्हा बसचालकावर दाखल करण्यात आला.

याबाबत राधेशाम नारायण धूम(वय 43) धंदा मजुरी रा. कवडेनगर अहमदनगर यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी माझे मित्र नितीन गंगाधर जाधव यांच्याबरोबर त्यांच्या फोर्ड फिएस्टा कंपनीच्या कारमधून (क्र. एमएच 16 एपी2277) मधून मित्राच्या मुलीच्या लग्नावरून नगरकडे परत येत होतो. हॉटेल दत्त दिगंबर समोरून जात असताना समोरून अहमदनगरकडून पुणे ते कळमनुरी ही एसटी बस (क्र. एमएच 20 बीएल 1693) भरधाव वेगात आली व तिने राँगसाईडला घुसून आमच्या कारला समोरून जोराची धडक दिली.

अपघातात कारचालक नितीन गंगाधर जाधव वय-45 (रा. नालेगाव, नगर) हे छातीला व डोक्याला मार लागल्याने ठार झाले. तर मलाही छातीला मार लागला. बसचालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला असून त्याचे नाव सतीश दत्तात्रय मुसळे (रा. जिंतूर ता. सेलू जि. परभणी) असल्याचे मला समजले आहे. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी बसचालकाविरुद्ध अविचाराने भरधाव बस चालवून राँग साईडला घुसून कारला समोरून जोराची धडक देऊन एकाच्या मृत्यूस व एकाच्या जखमी होण्यास तसेच दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरला म्हणून भारतीय दंड विधान कलम 304(अ), 337, 338, 427, मोटार वाहन कायदा 184 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

  • मृत व जखमी नगरमधील; लग्न सोहळा आटोपून औरंगाबादहून नगरला परतत होते
  • देवगड फाट्याजवळ चुकीच्या बाजने येऊन पुणे-कळमनुरी बसने दिली समोरून धडक

LEAVE A REPLY

*