चांदवडनजीक ‘विनावाहक विनाथांबा’ला अपघात; २६ प्रवाशी जखमी

0
चांदवड | मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड नजीक राज्य परिवहन महामंडळाच्या विनावाहक, विनाथांबा बसने गॅस टँकरला पाठीमागून धडक दिल्याने बसचालकासह २६ प्रवासी जखमी झाल्याची घटना आज रविवार (दि.९) रोजी  घडली.
दरम्यान अपघात गंभीर असला तरी कुठलीही जीवीतहाणी झाली नाही. याबाबत चांदवड पोलीस स्थानकात रात्री उशिरा पर्यंत अपघाताचा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
नाशिक येथून धूळ्याकडे जाणारी धूळे आगाराची बस (क्र.एमएच २० बीएल ३४६८) दुपारी ३ वाजेच्या सुमारास चांदवड नजीक असलेल्या आडगाव टप्पा येथील हनूमान मंदिरासमोर आल्यानंतर पुढे जाणार्‍या हिंदूस्थान पेट्रोलियम कंपनीचा भरलेल्या गॅस कंटेनर (क्र.एमएच ४३, वाय १८६७) यास पाठीमागून जोरदार धडक दिली.
या धडकेत बस चालक महिंद्र सनैट (वय ३१) रा. धूळे  यांच्यासह बसमधील इतर २५ प्रवासी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच येथील सोमा टोलवे कंपनीचा अपघात विभाग व चांदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मिळेल त्या वाहनाने चांदवड उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले.
येथे प्राथमिक उपचारानंतर जखमींना महामंडळाच्या विशेष बसने धूळ्याकडे रवाना करण्यात आले. याबाबत पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, उपनिरीक्षक कैलास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी तपास करीत आहे.
अपघातातील जखमींची नावे : वामन नागरे (वय ८७, रा. आनंदखेडा, धुळे), नरेंद्र चौधरी (वय ४२, शहादा रा. धूळे), प्रल्हाद पाटील (वय ५४, जवखेडा, ता. अंमळनेर), दिनानाथ  सिंग (वय ५७, शिरपूर, धूळे), राजेंद्र  चौधरी (वय ५०, देवपूर दत्तमंदिर धुळे), पुष्पा ठाकरे (वय २८, स्वामी विवेकानंद कॉलनी, धूळे), सत्यजित  गायकवाड (वय ३५ राहणार शितोड, धूळे), अंकूश सावकार (वय ५५, रा. धूळे), अविनाश पाटील (वय २६,  रा.वाडी भोकर धूळे), मिराबाई  चौधरी (वय ६४, रा. वाडी भोकर रोड ज्ञानदीप सोसायटी धूळे), अनिल  पाटील (वय ४४,  रा. तळेगाव अंजनेरी, नाशिक), बिबा  तांबोळी (वय ६५, रा. नेर, ता. साक्री ,धूळे), भटाबाई  माळी (वय ६५),  नारायण माळी (वय ७०) दोघे राहणार जूने धूळे), गोविंद मराठे, (वय ४८, पारोळा, जिल्हा जळगाव), शांताराम भदा पाटील (वय ६०,  रा. मोहाडी, धूळे), कल्पना  हिवाळे(वय ३८, रा. तरूणाविहार सोसायटी अंजनीनगर, धूळे), भास्कर  हिवाळे (वय ४७,  रा. तरूणाविहार सोसायटी अंजनीनगर धूळे), रविंद्र  पाटील (वय २४  निमडाळे जि. धूळे), श्‍वेता बोरसे (वय २५, पंचवटी नाशिक), जुलेखा तांबोळी (वय ४०, रा. नेर , ता. साक्री , जि. धूळे), अर्पिता  ठाकरे (रा. नाशिक), निलेश वाघ (वय २५,  रा. धूळे), मनोज  नगराळे (वय ३०, रा. शहादा धूळे), पूजा नगराळे (वय २४ रा. शहादा धूळे).

LEAVE A REPLY

*