विभाग निकालात पावणे दोन टक्क्यांची घसरण

यंदा निकाल आलेख ८७.७६ वर

0
नाशिक, दि.१३, प्रतिनिधी- नाशिक विभागाचा निकाल यंदा पावणेदोन टक्क्यांनी घसरला आहे. यंदा ८७.७६ टक्के इतका निकाल लागला. २०१६ मध्ये हाच निकाल ८९.६१ इतका होता. याबाबत परीक्षा मंडळाकडे विचारणा करता निकालात चढउतार होत असतो, असे सांगण्यात आले.

विभागातील ४६ हजार ८६४ विद्यार्थ्यांना विशेष प्राविण श्रेणी मिळाली तर ७७ हजार ५७३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ४७ हजार २७० विद्यार्थी व्दीतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर ५ हजार ९८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या परिक्षेत यंदा ५६ विषय होते त्यापैकी नाशिक विभागातज ३६ विषयांमध्ये परिक्षा देण्यात आली. त्यासाठी ११२ प्रश्‍नपत्रिका देण्यात आल्या होत्या.

यावर्षी १९३ गैरमार्ग प्रकरणे आढळली. त्यापैकी १३४ उमेदवारांना मंडळ शिक्षासूचीनुसार शास्ती करण्यात आली आहे. निकालात विषयवार इंग्रजी प्रथम भाषेचा निकाल ९८.९७ टक्के तर त्याखालोखाल मराठी व्दितीय, तृतीय भाषेचा निकाल ९७.९५ टक्के , सामाजिकशास्त्रे ९६.९९, विज्ञान ९५.९५, उर्दू प्रथम भाषा ९३.७७, हिन्दी व्दतीय, तृतीय भाषा ९१.६६ तर गणित ९०.७८, मराठी प्रथम भाषा ८९.८१, इंग्रजी व्दीतीय तृतीय भाषा ८८.१४ असा निकाल लागला.

विभागात धुळे जिल्हयाचा निकाल सर्वाधिक ८९.७९ लागला असून तेथे प्रविष्ट झालेल्या २८ हजार ७३२ विद्यार्थ्यांपैकी २५ हजार ७९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याखालोखाल जळगाव जिल्हयाचा निकाल ८७.७८ इतका लागला. तेथे ६१ हजार ८२५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.

त्यापैकी ५४ हजार २६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नाशिकचा निकाल ८७.४२ टक्के इतका लागला असून ९१ हजार १७९ विद्यार्थ्यांपैकी ७९ ७१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नंदुरबारचा निकाल सर्वात कमी म्हणजेच ८६.३८ टक्के इतका लागला. तेथे २० हजार ७४२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी १७ हजार ९१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा भयमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी ४१७ पैकी १४८ केंद्रांवर चित्रीकरण करण्यात आले होते. १९३ पैकी १३४ कॉपी केससवर शास्ती करण्यात आली आहे तर मागील वर्षी हेच प्रमाण २४१ पैकी १९७ प्रकरणात शास्ती इतके होते.

गुणपडताळणी अर्ज आजपासून
ऑनलाईन निकालाच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजे बुधवार दि.१४ पासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज नाशिक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी १४ ते २४ जूनदरम्यान अर्ज करता येईल तर छायाप्रती अर्थात झेरॉक्स मिळण्यासाठी १४ जून ते ३ जुर्लैपर्यंत शुल्क भरून अर्ज करता यईल.

६ विषय नवीन
यंदाच्या दहावीच्या परीक्षेत राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत व्यावसायिक विषयांचा समावेश करण्यात आला होता. त्यात मल्टीस्कील फउंडेशन कोर्स विषयात ७४० पैकी ७३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ऑटोमोबाईल टेक्नोलॉजी विषय ३५५/३५६, रिटेल मर्चटायझिंगमध्ये ४२/४२, हेल्थकेअर विषयात ३३८/३४२, ब्युटी ऍण्ड वेलनेसमध्ये २२१/२२२ फिजिकल एज्युकेशन ऍण्ड स्पोर्टस विषयात ८२/८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

श्रेणीनिहाय निकाल
विशेष प्राविण्य ४६ हजार ८६४
प्रथम श्रेाणी ७७ हजार ५७३
व्दितीय श्रेणी ४७ हजार २७०
पास श्रेणी ५ हजार ९८६
एकूण उत्तीर्ण १ लाख ७७ हजार ६९३

LEAVE A REPLY

*