नाशिक विभागाचा ८७.७६ टक्के निकाल

0
नाशिक : बहुप्रतिक्षीत दहावी परिक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर झाला. यात नाशिक विभागाचा एकूण निकाल 87.76 टक्के इतका लागला.

या निकालाचे वैशिष्टय म्हणजे यात मुलींनी आघाडी घेतली असून त्यांची उत्तीर्ण टक्केवारी 90.69 टक्के इतकी आहे तर मुलांचा निकाल 85.50 टक्के इतका लागला. धुळे जिल्हयाचा सर्वाधिक निकाल 89.79 टक्के लागला असून त्याखालोखाल जळगाव 87.78, नाशिक 87.42, नंदुरबार 86.36 टक्के निकाल लागला.

यंदाच्या दहावीच्या परिक्षेसाठी नाशिक विभागातून 2 लाख 2 हजार 478 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी 1 लाख 77 हजार 693 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या परिक्षेत 24 हजार 785 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.

88 हजार 126 मुली या परिक्षेसाठी प्रविष्ठ झाल्या होत्या त्यापैकी 79 हजार 922 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्या तर प्रविष्ठ झालेल्या 1 लाख 14 हजार 352 विद्यार्थ्यांमधून 97 हजार 771 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षीचा निकाल पाहता यंदा नाशिक विभागाचा निकाल पावणे दोन टक्क्यांनी घसरला.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आठ ते दहा दिवसात निकालपत्रक शाळेतून वितरीत केली जाणार आहेत. संपूर्ण राज्याच्या निकालात नाशिक विभाग निकालाच्या बाबतीत सहाव्या स्थानावर आहे.

दरम्यान, 14 ते 23 जूनपर्यंत उत्तरपत्रिका पुर्नतपासणीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. तर झेरॉक्स मिळण्यासाठी 14 जून ते 3 जुर्लपर्यंत अर्ज करता येतील.

LEAVE A REPLY

*