नाशिक विभागात मुलीच आघाडीवर

दहावी परिक्षेत नाशिकचा निकाल ८७.७६ टक्के

0
नाशिक, दि.१३, प्रतिनिधी- बहुप्रतिक्षीत दहावी परिक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर झाला. यामध्ये नाशिक विभागाचा एकूण निकाल ८७.७६ टक्के इतका लागला. या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे मुलींनी आघाडी घेतली असून त्यांची उत्तीर्ण टक्केवारी ९०.६९ टक्के इतकी आहे तर मुलांचा निकाल ८५.५० टक्के इतका लागला.

धुळे जिल्हयाचा सर्वाधिक ८९.७९ टक्के निकाल लागला असून त्याखालोखाल जळगाव ८७.७८, नाशिक ८७.४२ व नंदुरबार ८६.३६ टक्के निकाल लागला. यंदाच्या दहावी परिक्षेसाठी नाशिक विभागातून २ लाख २ हजार ४७८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १ लाख ७७ हजार ६९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

परीक्षेत २४ हजार ७८५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. ८८ हजार १२६ मुली या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाल्या होत्या त्यापैकी ७९ हजार ९२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्या तर प्रविष्ठ झालेल्या १ लाख १४ हजार ३५२ विद्यार्थ्यांमधून ९७ हजार ७७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

मागील वर्षीचा निकाल पाहता यंदा नाशिक विभागाचा निकाल पावणे दोन टक्क्यांनी घसरला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आठ ते दहा दिवसात निकालपत्रक शाळेतून वितरीत केली जाणार आहेत. संपूर्ण राज्याच्या निकालात नाशिक विभाग निकालाच्या बाबतीत सहाव्या स्थानावर आहे. दरम्यान, १४ ते २३ जूनपर्यंत उत्तरपत्रिका पुनर्तपासणीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत, तर झेरॉक्स मिळण्यासाठी १४ जून ते ३ जुर्लपर्यंत अर्ज करता येतील.

१८ जुलैपासून परीक्षा
अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जावू नये यासाठी त्या विद्यार्थ्यांना १९ जूनपासून अर्ज भरता येणार आहेत. १८ जुर्लपासून या विद्यार्थ्यांची परीक्षा होवून त्यांना याच वर्षी अकरावीसाठी प्रवेश घेता येणार आहे. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी संयम ठेवत परिक्षा द्यावी असे आवाहन परिक्षा मंडळाचे नाशिक विभाग अध्यक्ष राजेंद्र गोधने यांनी केले आहे.

विभागनिहाय निकाल (प्रमाण टक्केवारीत)
मुंबईः ९०.०९
कोकणः ९६.१८
पुणेः ९१.९५
नाशिकः ८७.७६
नागपूरः ८३.६७
कोल्हापूरः ९३.५९
अमरावतीः ८४.३५
औरंगाबादः ८८.१५
लातूरः ८५.२२
उत्तीर्ण मुलं – ८६.५१
उत्तीर्ण मुली – ९१.४६

LEAVE A REPLY

*