राज्यात दहावीचा निकाल ८८.७४ टक्के

0

मुंबई |  राज्यात दहावीचा निकाल आज सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. यावर्षी मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल ९१.४६ टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल ८८.७४ टक्के लागला आहे.

विद्यार्थ्यांना गुणपत्रिका 24 जून रोजी दुपारी 3 वाजता शाळेत मिळेल, असं बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हामणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महाराष्ट्रात कोकण विभागाने निर्विवाद वर्चस्व राखत सर्वात जास्त म्हणजे ९६.१८ टक्के निकाल लागला आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर ९३.५९ टक्के निकाल लागला आहे.

नाशिक मात्र बऱ्याच खाली असून नाशिक विभागाचा निकाल ८७.७६ टक्के लागला आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा 18 जुलैपासून होणार असल्याची माहिती बोर्डाकडून सांगण्यात आली आहे.

राज्याचा विभागनिहाय निकाल :

कोकण -96.18 टक्के

कोल्हापूर – 93.59 टक्के

पुणे – 91.95 टक्के

मुंबई – 90.09 टक्के

औरंगाबाद – 88.15 टक्के

नाशिक – 87.76 टक्के

लातूर – 85.22 टक्के

अमरावती – 84.35 टक्के

नागपूर – 83.67 टक्के

या ठिकाणी बघा निकाल

http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना एक वाजेपासून निकाल पाहावयास मिळणार आहे.

येथेही विद्यार्थ्यांना निकाल बघता येणार आहे

1. www.mahresult.nic.in

2. www.result.mkcl.org

3. www.maharashtraeducation.com

4. https://mahahsscboard.maharashtra.gov.in/

LEAVE A REPLY

*