श्रीरामपूर तालुका : दहावीचा 80.70 टक्के निकाल

0

सहा विद्यालयांचा 100 टक्के निकाल

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचा इयत्ता दहावीचा निकाल काल जाहीर झाला असून यात श्रीरामपूर तालुक्याचा 80.70 टक्के निकाल लागला आहे. तालुक्यात या वर्षी 6 विद्यालयांनी 10 वीचा शंभर टक्के निकाल लावला आहे तर सर्वात कमी निकाल डॉ. बी. जी. कल्याणकर रात्री प्रशालेचा 38.63 टक्के इतका लागला आहे.
ग्रामीण माध्यामिक विद्यालय, टाकळीभान 86.84 टक्के, न्यू इंग्लिश स्कूल, माळवाडगाव 96.49 टक्के, मॉडेल इंग्लिश स्कूल, श्रीरामपूर 100 टक्के, ज्ञानदीप माध्यामिक विद्यालय, दत्तनगर 86.11 टक्के, न्यू इंग्लिश स्कूल, मातापूर 92.85 टक्के, सेंट झेवियर हायस्कूल, श्रीरामपूर 100 टक्के, आदर्श माध्यामिक विद्यालय, गोंधवणी 54.54 टक्के, डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यामिक विद्यालय, श्रीरामपूर 55.88 टक्के, न्यु इंग्लिश स्कूल, भामाठाण 62.96 टक्के, डी.पॉल इंग्लिश मीडियम, श्रीरामपूर 100 टक्के,

पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी माध्यामिक विद्यालय, नायगाव 67.74 टक्के, स्मारक विद्यालय, गोवर्धनपूर 60 टक्के, हजरत एम.एम.हुसेन उर्दु हायस्कूल 82.75 टक्के, शाह छप्परबंद उर्दु हायस्कूल, मिल्लतनगर 90 टक्के, दिव्या दयानंद इंग्लिश मेडीयम स्कुल, भोकर 100 टक्के, विद्यानिकेतन अ‍ॅकेडमी, श्रीरामपूर 94.11 टक्के, प्रवरा विद्यानिकेतन, फत्त्याबाद 89.61 टक्के, रामराव आदिक पब्लिक स्कूल, निपाणी वडगाव 98.73 टक्के, शंकरराव एस.डावखर कन्या विद्यालय,श्रीरामपूर 70.17 टक्के,

न्यू इंग्लिश स्कूल, निमगाव खैरी 85.24 टक्के, जानकीबाई एस. आदिक विद्यालय, खानापूर 82.22 टक्के, श्रीमती जानकीबाई माध्यामिक कन्या विद्यालय, निपाणी वडगाव 81.13 टक्के, न्यू इंग्लिश स्कूल, शिरसगाव 78.51 टक्के, रघुनाथ पाटील औताडे माध्यामिक विद्यालय, 92.06 टक्के, प्रेमजी रतनसी पटेल हायस्कूल 73.80 टक्के, काशिनाथ पाटील मुरकुटे विद्यालय, कमालपूर 68 टक्के.75 टक्के,

न्यू इंग्लिश स्कूल, भेर्डापूर 76.08 टक्के, न्यू इंग्लिश स्कूल, मुठेवडगाव 87.09 टक्के, गोंडेगाव माध्यामिक विद्यालय, गोंडेगाव 89.70 टक्के, गोरक्षनाथ माध्यामिक विद्यालय, खोकर 71.73 टक्के, वाघुजी रामजी पाटील विद्यालय, बेलापूर खुर्द 66.66 टक्के, प्रवरा माध्यामिक विद्यालय, गळनिंब 86.66 टक्के, पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर उर्दु हायस्कूल 100 टक्के,

छत्रपती शिवाजी विद्यालय, वडाळा महादेव 87.50 टक्के, संत तेरेजा हायस्कूल हरेगाव 94.33 टक्के, न्यू इंग्लिश स्कूल, टाकळीभान 90.84 टक्के, जे. के. सोमैय्या हायस्कूल, श्रीरामपूर 61.11 टक्के, भास्करराव पाटील गलांडे पाटील विद्यालय, उंदीरगाव 78.94 टक्के, सद्गुरू गंगागिरी विद्यालय, नाऊर 87.70 टक्के, डॉ. बी.जी.कल्याणकर रात्र प्रशाला, श्रीरामपूर 38.73 टक्के, श्री. एकनाथ केशव औटी विद्यालय मालुंजा 83.60 टक्के,

न्यू इंग्लिश स्कूल, खंडाळा 83.33 टक्के, श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, श्रीरामपूर 70.43 टक्के, केशव गोविंद विद्यालय, बेलापूर खुर्द 86.33 टक्के, श्री. जगदंबा प्रसारक विद्यालय, भोकर 84.72 टक्के, न्यू इंग्लिश स्कूल, कारेगाव 80.14 टक्के, न्यु इंग्लिश स्कूल, उक्कलगाव 85.41 टक्के, खा. गोविंदराव आदिक उर्दु हायस्कूल, श्रीरामपूर 75.40 टक्के, न्यू इंग्लिश स्कूल, श्रीरामपूर 100 टक्के, संत तेरेजा बॉईज हायस्कूल, श्रीरामपूर 82.43 टक्के अशा प्रकारे निकाल लागला आहे.

4477 विद्यार्थी परीक्षेस बसले
दहावीच्या परीक्षेसाठी श्रीरामपूर तालुक्यातून 4492 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते त्या पैकी 15 विद्यार्थी परीक्षेस बसू शकले नाहीत. एकूण 4477 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यामुळे श्रीरामपूरचा दहावीचा निकाल 80.70 टक्के इतका लागला आहे. 

सायबर कॅफेवर गर्दी
इयत्ता दहावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी इंटरनेट कॅफे, सायबर कॅफेवर मोठ्या गर्दीने येऊन आपला निकाल पाहत होते.

LEAVE A REPLY

*