प्रवरा माध्यमिक विद्यालय : 100 टक्के निकाल

0
शिर्डी (प्रतिनिधी) – प्रवरा माध्यमिक विद्यालय आडगावचा दहावीच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. या परीक्षेसाठी एकूण 49 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यात 18 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले. प्रथम श्रेणीत 21 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दीपक लहामगे याने 90.60 टक्के, माधुरी शेळके 89.20 टक्के, अक्षय शेळके व प्रतीक्षा शेळके यांनी 87.00 टक्के गुण मिळवून विषेश प्राविण्य मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, हरिभाऊ आहेर, श्री. रेठरेकर, मुख्याध्यापक मुस्ताक शेख, श्री. पारखे, श्री. निर्मळ, बाळासाहेब घोलप, भारत पुलाटे, गायकर, श्री. लोंढे, सौ. सिनारे, श्री. त्रिभुवन, श्री. राजगुरू, श्रीमती तोडमल, संपत विखे, शशिकांत आहेर, श्री माघाडे, श्री. चौधरी, श्री किशोर आहेर तसेच स्कूल कमिटी व व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

*