‘नगर कन्या’ सुस्साट!

0

जिल्हा 90.09, मुली 93.58, मुले 87.60, फेरपरीक्षा 18 जुलै

श्रीगोंद्याचा करण पवार नगर जिल्ह्यात प्रथम

अहमदनगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल 90.9 टक्के लागला. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 87.60 टक्के आहे. मुलींची टक्केवारी 93.58 आहे. दरम्यान, श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती विद्यालयातील दहावीचा विद्यार्थी करण पवार याला 99.60 टक्के गुण मिळालेले आहेत. बहुदा करण हा जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाने दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे मानले जात आहे.

जिल्ह्यातून 76 हजार 432 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यातील 67 हजार 470 उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांना कलचाचणीचा अहवाल व मूळ गुणपत्रिका 24 जून रोजी शाळेत मिळणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. मार्च महिन्यांत विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा झाली होती. परीक्षेला नगर शहरातून 7 हजार 608 आणि जिल्ह्यातील 14 तालुक्यांतून 76 हजार 432 विद्यार्थी बसले होते. यातील 67 हजार 470 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत 17 हजार 758 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 26 हजार 234 विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि 19 हजार 31 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 3 हजार 512 सामान्य श्रेणीत परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील 139 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
पुणे विभागात यंदा नगर जिल्ह्यात निकाल सर्वात तळाला असून पुणे जिल्हाचा निकाल 92. 74 टक्के, सोलापूरचा निकाल 91. 95 टक्के आणि नगरचा निकाल 90.9 टक्के आहे. पुर्नपरिक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याने आघाडी घेतली असून निकाल 50.52 टक्के लागला आहे. तर पुण्याचा निकाल 42.11 टक्के असून नगरचा निकाल 41.35 टक्के आहे.
जिल्ह्यात 14 तालुक्यापैकी सर्वात चांगला निकाल पारनेर तालुक्याचा असून तालुक्यातून 4 हजार 382 विद्यार्थी बसले होते. यापैकी 4 हजार 154 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 94. 80 टक्के निकाल लागला आहे. पाथर्डी तालुक्याचा निकाल 93.39 टक्के लागला असून तालुक्यातून 4 हजार 751 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 4 हजार 437 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. सर्वात कमी निकाल श्रीरामपूर तालुक्याचा निकाल 80 टक्के लागला असून तालुक्यातून 4 हजार 477 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 3 हजार 613 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोपरगाव तालुक्याचा निकाल 86 टक्के लागला असून तालुक्यातून 5 हजार 395 विद्यार्थी बसले होते. यातून 4 हजार 648 विद्यार्थी पास झालेले आहेत.

दक्षिणेतील विद्यार्थ्यांची बाजी
सर्वसाधारणपणे उत्तर नगर जिल्ह्यातील काही तालुुक्यांचा दहावीच्या निकालात दबदबा असायचा. पण यंदा दक्षिणेतील सर्वच तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उत्तरेतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत घवघवीत यश मिळविले आहे. निकालाची तालुकानिहाय आकडेवारी अशी…

दक्षिण नगर जिल्हा

तालुका टक्केवारी
पारनेर 94.80
पाथर्डी 93.39
श्रीगोंदा 93.07
शेवगाव 93.00
कर्जत 91.90
नगर 91.45
जामखेड 90.76

उत्तर नगर जिल्हा

तालुका टक्केवारी
राहाता 90.26
अकोले 89.68
नेवासा 89.59
संगमनेर 89.58
राहुरी 86.69
कोपरगाव 86.15
श्रीरामपूर 80.70

पारनेरचा डंका 

जिल्ह्यात पारनेरचा सर्वाधिक म्हणजे 94.80 टक्के निकाल लागला आहे. विशेष म्हणजे याच तालुक्यातील सर्वाधिक मुलींची सरशी झाली आहे. याच तालुक्यातील सर्वाधिक  मुले उत्तीर्ण झाले आहेत.   निकाल 94.80  मुली उत्तीर्ण 96.93 टक्के  मुले उत्तीर्ण 93.94 टक्के

LEAVE A REPLY

*